भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने युवा फलंदाज शुबमन गिल याच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर 8 बाद 349 धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या प्रमुख फलंदाजांनी नांग्या टाकल्यावर युवा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलने अखेरपर्यंत संघर्ष करत भारतीय संघाला विजयासाठी झुंजवले.
Michael Bracewell's heroic innings goes in vain as India edge the Kiwis in a high-scoring ODI in Hyderabad 🤯#INDvNZ | 📝: https://t.co/raJtMjMaEn pic.twitter.com/S3TU8hLGMr
— ICC (@ICC) January 18, 2023
भारतीय संघाने उभारलेल्या मोठ्या भावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सर्व प्रमुख फलंदाज अपयश ठरली. न्यूझीलंड संघाने आपले पहिले 6 फलंदाज केवळ 131 धावांवर गमावले होते. मात्र, त्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या युवा मायकेल ब्रेसवेलने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. त्याने दुसरा अष्टपैलू मिचेल सॅंटनर याला साथीला घेत शतकी भागीदारी रचली. दोघांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही.
प्रथमच भारतात खेळत असलेल्या ब्रेसवेलने फिरकी गोलंदाजांचा यशस्वी सामना केला. सुरुवातीला त्याने अर्धशतक साजरे केले. त्यानंतर हार्दिक, सुंदर व शमी यांच्यावर हल्ला चढवत केवळ 57 चेंडूंमध्ये त्याने शतक पूर्ण केले. यात 11 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील केवळ दुसरे शतक ठरले. एका बाजूने सर्व फलंदाज बाद होत असताना तो अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर उभा राहिला. अखेरच्या षटकात विजयासाठी 20 धावांची गरज असताना त्याने षटकार मारून न्यूझीलंडला सामन्यात कायम ठेवले. पुढील चेंडू वाईड गेल्याने भारतीय संघावरील दडपण वाढलेले. मात्र, शार्दुल ठाकूरने पुढील चेंडूवर त्याला पायचित करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. ब्रेसवेलने आपल्या 140 धावांच्या खेळीत 78 चेंडूचा सामना करताना 12 चौकार व 10 षटकारांचा पाऊस पाडला.
यासोबतच त्याने न्यूझीलंडसाठी वनडे क्रिकेटमध्ये तिसरे सर्वात वेगवान शतक पूर्ण केले. न्यूझीलंडसाठी कोरी अँडरसनने केवळ 36 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. तर, जेसी रायडर याने 46 चेंडूत शतक झळकावण्याचा कारनामा केलेला.
Newzealand Michael Bracewell Hits Century Against India In Hyderabad ODI
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलने मैदान मारलं! शुबमनचे न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी द्विशतक, गोलंदाजांची मोडली कंबर
तूच रे पठ्ठ्या! गिलने शतक ठोकताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, विराट अन् धवनलाही टाकले मागे