नुकताच न्यूझीलंड आणि बांगलादेश (Newzealand vs Bangladesh) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने जोरदार पुनरागमन करत अवघ्या ३ दिवसात सामना आपल्या नावावर केला होता. यासह ही मालिका १-१ च्या बरोबरीत सुटली होती. दरम्यान, या सामन्यातील दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसनने (Kyle Jamieson) असे काही कृत्य केले होते. ज्याचा त्याला जबरदस्त फटका बसला आहे.
काईल जेमिसनने ख्राईस्टचर्च कसोटीत यासिर अलीला (Yasir Ali) बाद केल्यानंतर, शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले होते. परिणामी आयसीसीने या गोष्टीची दखल घेत, मंगळवारी (११ जानेवारी ) त्याच्या सामना शुल्कवर १५ टक्के दंड आकारला आहे.
आयसीसीने (ICC) आपल्या स्पष्टीकरणात म्हटले की, काईल जेमिसनने खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान भाषा, कृती किंवा हावभाव वापरण्याशी संबंधित आहे, ज्यामुळे फलंदाज बाद झाल्यानंतर आक्रमकपणे प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त होऊ शकतो.
अधिक वाचा – व्याजासकट परतफेड! न्यूझीलंडने ३ दिवसात बांगलादेशला चारली पराभवाची धूळ; क्लीन स्विपची नामुष्कीही टळली
यासह त्याला डीमेरिट अंक देखील देण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यात काईल जेमिसनने तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्या नावे आता ३ डीमेरिट अंक झाले आहेत. यापूर्वी, काईल जेमिसनने २३ मार्च २०२१ रोजी क्राइस्टचर्च येथे बांगलादेश विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात आणि २८ डिसेंबर २०२० रोजी तौरंगा येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केले होते.
व्हिडिओ पाहा – वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता
नेमकं काय घडलं होतं?
आयसीसीने म्हटल्यानुसार, ही घटना सोमवारी (१० जानेवारी ) न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडली. त्यावेळी ४१ व्या षटकात काईल जेमिसनने यासिर अलीला बाद केल्यानंतर शिवीगाळ केली होती. त्यावेळी काईल जेमिसनने उल्लंघन केल्या प्रकरणी सामनाधिकारी जेफ क्रो यांनी ठोठावलेला दंड मान्य केला होता.
महत्वाच्या बातम्या :
सिडनी कसोटीत दोन शतकांसह दणक्यात पुनरागमन करणाऱ्या ख्वाजासाठी वॉर्नर भावुक; म्हणाला, ‘स्वप्न अशीच…’
वन मॅन आर्मी! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाकी झुंज देणाऱ्या कोहलीचे होतंय भरभरून कौतुक, पाहा खास ट्वीट्स