अवघ्या काही दिवसांतच क्रिकेट चाहत्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा थरारक अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी आमने सामने येणार आहेत. या सामन्यासाठी न्यूझीलंड संघात मुंबईत जन्मलेल्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे, जो कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात अंतिम ११ जणांमध्ये खेळताना दिसू शकतो. हा क्रिकेटपटू म्हणजे, एजाज पटेल.
न्यूझीलंड संघाचा फिरकी गोलंदाज एजाज पटेल याला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते. त्याला मंगळवारी (१५ जून) जाहीर झालेल्या न्यूझीलंडच्या अंतिम संघात जागा मिळाली आहे. न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय कसोटी संघ निश्चित केला आहे.
काही दिवसांपुर्वी एजाज पटेलने भारताविरुद्ध कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले होते. एतो म्हणाला होता की, “जो देश आपली मायभूमी आहे. त्या संघाविरुद्ध खेळणे सोपे नसते. परंतु मला जर असे करण्याची संधी मिळाली; तर हा माझ्या आयुष्यातील अविश्वसनीय क्षण असेल. हा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.”
एजाज पटेलची कारकीर्द
मुंबईत जन्म घेतलेला न्यूझीलंड संघातील फिरकी गोलंदाज एजाज पटेल याने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात तब्बल ७ गडी बाद केले होते. याच कामगिरीमुळे त्याला सामनवीर पुरस्कार देण्यात आला होता. त्याने आतापर्यंत एकूण ८ सामने खेळेल आहेत. यात त्याला ३३.३ च्या सरासरीने २२ गडी बाद केले आहेत.
https://youtu.be/_0rdfNGnzpM
पाच खेळाडू झाले संघाबाहेर
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडच्या मायभूमीत २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. या मालिकेत त्यांनी १-० असा विजय मिळवला आहे. या सामन्यासाठी एकूण २० सदस्यीय संघाची निवड करण्यात आली होती. याच संघातील १५ खेळाडूंना भारताविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. डग ब्रेसवेल, जॅकब डफी, डॅरेल मिचेल, रचिन रविंद्र आणि मिचेल सेंटनर या ५ खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे.
असा आहे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ– केन विलियम्सन (कर्णधार), टॉम बंडल, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅच हेनरी, कायल जेमिसन, टॉम लॅथम, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, टीम साउथी, रॉस टेलर, निल वॅगनर, बीजे वॅटलिंग आणि विल यंग
महत्त्वाच्या बातम्या-
टेस्ट चॅम्पियनशीप: ‘हा’ युवा गोलंदाज ठरेल बुमराहचा सर्वोत्कृष्ट पर्याय, माजी दिग्गजाने सांगितले नाव
“मंकडींग करून त्याला व्हिलन नव्हते बनायचे”, रविचंद्रन अश्विनचा युवा खेळाडूविषयी मोठा दावा