कोरोना महामारीमुळे जवळपास ठप्प असलेले भारतीय क्रिकेट लवकरच पुन्हा एकदा सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत सर्व राज्य संघटनांना पत्रे लिहिली असून, याची लवकरच औपचारिक घोषणा होईल. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच रद्द झालेली भारतातील प्रमुख क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून खेळली जाईल.
गतवर्षी रणजी ट्रॉफी झालेली रद्द
गतवर्षी कोरोना महामारीच्या कारणाने भारतीय क्रिकेट थंडावले होते. मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या काळात एकही सामना भारतामध्ये खेळला गेला नाही. त्यादरम्यान बीसीसीआयने रणजी ट्रॉफी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धा चालू वर्षाच्या सुरुवातीस खेळल्या गेल्या होत्या. महिला क्रिकेटचा एकही सामना या कालावधीत खेळला गेला नाही.
या दिवशी सुरू होणारा देशांतर्गत हंगाम
सध्या भारतातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याने बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सर्व राज्य संघटनांना याबाबतची पत्रे दिली आहेत. वरिष्ठ संघांच्या क्रिकेट हंगामाची सुरुवात २७ ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीने होईल. देशातील प्रमुख वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी १ ते २९ डिसेंबर या काळात खेळली जाईल. तर, सर्वात मोठी प्रथमश्रेणी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचे नियोजन ५ जानेवारी ते २० मार्च या काळात होईल.
देशांतर्गत क्रिकेट हंगामाची खरी सुरुवात पुढील महिन्यात २० सप्टेंबरपासून होईल. एकोणीस वर्षाखालील मुलांची व मुलींची वनडे स्पर्धा असलेली विनू मंकड ट्रॉफी या दिवशी सुरू करण्यात येईल. एकोणीस वर्षाखालील मुलांची व मुलींची चॅलेंजर ट्रॉफी २५ व २६ ऑक्टोबर रोजी सुरु होईल. वरिष्ठ महिलांची स्पर्धा २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या काळात खेळविण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे’ २ शिलेदार विराटला देणार धक्का, युएईतील राहिलेल्या आयपीएल हंगामातून घेऊ शकतात माघार
तयारी आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची! क्वारंटाईन संपवून सीएसकेची सरावास सुरुवात, फोटो व्हायरल
T20 World Cup: आझमचं एक ऐकेनात निवडकर्ते, टी२०त १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूला संधी देण्यास नकार