ब्राझिल आणि पॅरीस सेंट-जर्मनचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियर याची आई नॅदीने गॉनकाल्वज ही त्याच्या मदतीला धावून आली आहे. नेमारने तो 2018च्या फिफा विश्वचषकातील सामन्यादरम्यान पडल्याचे नाटक करत होता हे मान्य केले आहे.
नेमारच्या या वागणुकीचे काही गमतीशीर व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपुर्वीच त्याचे चूक मान्य करण्याचे व्हिडिओ ब्राझिलमधील काही टीव्ही वाहिन्यांवर प्रसिद्ध झाले.
“तुम्हाला वाटते मी मैदानावर पडून दुखापत झाल्याचे मुद्दाम नाटक करत आहे. काही वेळेला मी अशी नाटके करतच होतो. पण सत्य हे आहे की काही वेळेला मला दुखापत झाली आहे”, असे नेमारने एका कार्यक्रमादरम्यानच्या म्हणाला.
गॉनकाल्वज यांनी त्यांच्या इंटाग्रामवर पोस्ट शेयर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहले,’टीकाकारांच्या टीकांनी निराश न होता तुझी मान नेहमी वर ठेव. मीच तुझी सगळ्यात मोठी प्रेक्षक असून मला तुझा अभिमान आहे. मी नेहमी तुझ्या पाठीशी असणार आहे.”
‘काही लोकांना तू फक्त फुटबॉलपटू म्हणून माहित आहे. पण मला तु वैयक्तिक जीवनात कसा आहे हे चांगलेच माहित आहे’, असेही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहले आहे.
https://www.instagram.com/p/Bl3lZ52HU5-/?utm_source=ig_web_copy_link
नेमार हा ब्राझिल संघ मायदेशी परतल्यावर पत्रकारांसमोर आला नाही. त्याने फक्त इंटाग्रामवर विश्वचषकातील पराभवाबद्दल पोस्ट शेयर केली होती.
या कार्यक्रमावेळी त्याने असे का केले हे स्पष्ट केले.
“जेव्हा मी मुलाखत न देता निघालो तेव्हा मला फक्त विजयाचे शब्द ऐकण्याची सवय आहे असे नाही. तर मी अजुनही तुम्हाला निराश करायचो शिकलो नाही. जेव्हा मी असभ्य वागतो त्याचे हे एकच कारण नाही की मी वाया गेलेला मुलगा आहे. तर त्याचे खरे कारण मला निराश होता येत नाही हे आहे.”
“तुम्ही माझ्यावर रागवा, बोला पण मला उभे राहण्यास मदत करा. जेव्हा मी उभा राहिल तेव्हा पुर्ण ब्राझिल माझ्यासोबत उभा राहिल, असे तो म्हणाला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–‘द वॉल’ राहुल द्रविडने केली भविष्यवाणी, कसोटी मालिकेत भारत पाजणार इंग्लंडला पाणी
–फुटबॉलच्या नियमांमध्ये मोठे बदल; प्रशिक्षकांची होणार पंचाईत