इंग्लिश प्रीमियर लीगच्या २७व्या हंगामात आज (११ ऑगस्ट) झालेल्या सामन्यात चेल्सीने हडर्सफिल्डचा ३-० असा पराभव केला.
यावेळी चेल्सीचा मिडफिल्डर एनगोलो कांटेने ३४व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
हॉर्हीनियोने ४५व्या मिनिटाला पेनाल्टी करत सामना पहिल्या सत्रात २-० असा आणला. पेड्रोने ८०व्या मिनिटाला केलेल्या गोलने चेल्सीने हा सामना जिंकत पूर्ण तीन गुण मिळवले.
“रविवारी (५ऑगस्ट) झालेल्या कम्युनिटी शिल्डच्या अंतिम सामन्यात मॅंचेस्टर सिटीकडून २-० असा पराभव झाल्यानंतर हा विजय क्लबसाठी महत्त्वाचा होता”, असे चेल्सीचे नवीन मॅनेजर मौरीझियो सॅरी म्हणाले.
फिफा विश्वचषकात खेळून आलेले एडन हॅझार्ड आणि ऑलिव्हर जिरोंड यांनी सोमवारी मैदानावर सराव केला. हे दोघे बदली खेळाडू म्हणून आजच्या सामन्यात खेळले.
या सामन्यात चेल्सी ४-३-३च्या फॉर्मेशनने खेळला. तसेच त्यांनी पाच वेळा या लीगचे विजेतेपद पटकावले आहे.
सामन्याला संथ सुरूवात झाल्यावर कांटेने या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चेल्सीकडून पहिला गोल केला. महिन्याभरापूर्वीच फ्रान्सला फिफा विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिल्यावर या २७ वर्षीय फुटबॉलपटूने मागील चारही प्रीमियर लीगच्या हंगामात गोल केले आहेत.
तसेच चेल्सीचा या लीगमधील पुढील सामना अर्सेनल विरुद्ध १८ ऑगस्टला होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–हार्दिक पंड्या अडकणार आयसीसीच्या जाळ्यात!
–सचिन तेंडुलकर म्हणतो कसोटी क्रिकेट वाचवायचे असेल तर हे करायलाच हवे