देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत आंदोलन सुरू केल्यानंतर खळबळ उडाली आहे. ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या व्यतिरिक्त, राष्ट्रकुल विजेती विनेश फोगट ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने क्रीडा मंत्रालय, साई, कुस्ती महासंघ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व्यतिरिक्त एकूण 15 महासंघांना नोटीस बजावली आहे. या महासंघांची अंतर्गत तक्रार समिती नसल्याचे सांगितले जात आहे.
कुस्तीपटूंच्या आंदोलना मुळे प्रामुख्याने कुस्ती महासंघाकडे सर्वांची नजर असली तरी, त्यातून देशात चालणाऱ्या विविध क्रीडा महासंघांच्या उणिवाही समोर आल्या आहेत. 2013 मधील लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार सर्व प्रकारच्या संस्था, कंपन्या आणि कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी) असणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास कायद्याचे उल्लंघन मानले जाईल.
सध्या भारतातील 30 पैकी 15 क्रीडा महासंघांमध्ये एकतर आयसीसी अस्तित्वात नाही किंवा अस्तित्वात असलेल्या महासंघांमध्येही नियमांचे पूर्ण पालन केले जात नाही.
आता NHRC ने या अहवालाचा दाखला देत या 16 महासंघांना नोटीस बजावली असून त्यांची उत्तरे मागवली आहेत. कुस्ती महासंघाव्यतिरिक्त, त्यात बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, तिरंदाजी, बास्केटबॉल यांसारख्या महासंघांचा समावेश आहे. या क्रीडा संघटनाच नव्हे तर NHRC ची नोटीस केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांनाही गेली आहे.
इतकंच नाही तर ही नोटीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच देशात क्रिकेट चालवणाऱ्या बीसीसीआयलाही पाठवण्यात आली आहे. ज्यामुळे बीसीसीआयही चौकशीच्या कक्षेत आली आहे. आयोगाने या सर्वांना पुढील 4 आठवड्यांत नोटीशीला उत्तर देण्यास सांगितले आहे.
दोन वर्षांपूर्वी बीसीसीआयचे माजी सीईओ राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले होते. हे आरोप बीसीसीआयचे सीईओ होण्यापूर्वीचे होते. त्यानंतर बीसीसीआयने तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. चौकशी अंती या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
(NHRC Issues Notice To 16 Sports Federation In India Along With BCCI After Wrestler Protest)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! ऑस्कर विजेत्या The Elephant Whisperers टीमला भेटला धोनी, गिफ्ट म्हणून दिली ‘ही’ खास वस्तू
‘त्यांनी मला फोन करून…’, खराब फॉर्ममध्ये असताना टीका करणाऱ्यांबद्दल नितीश राणाचा धक्कादायक खुलासा