---Advertisement---

MLC: निकोलस पूरनचे सर्वात जलद शतक अन् पोलार्डचा 1000 वा सिक्स; अमेरिकेत आले कॅरिबियन वादळ, मात्र…

On: गुरूवार, जुलै 16, 2026 11:07 AM
---Advertisement---

अमेरिकेत सुरू असलेली टी 20 लीग स्पर्धा म्हणजे मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) टी 20 स्पर्धेचा 2026 चा हंगाम सुरू आहे. यामध्ये गुरूवारी (16 जुलै) खेळल्या गेलेल्या सामन्यात कॅरिबियन फलंदाजांनी धुमाकूळ घातला आहे. वेस्ट इंडिजच्या दिग्गजांनी नॉकआऊट सामन्यांमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. या लीगमधील सर्वात जलद शतक निकोलस पूरनने (Nicholas Pooran) झळकावले, तर कायरन पोलार्डने (Kieron Pollard) टी 20 क्रिकेटमधील आपला 1000 वा षटकार मारून इतिहास रचला.

एमएलसीमध्ये सध्या एलिमिनेटरचे सामने सुरू आहेत. यामध्ये गुरूवारी वॉशिंग्टन फ्रीडम आणि एमआय न्यूयॉर्क ओकलंडमध्ये भिडले. वॉशिंग्टनचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत न्यूयॉर्कला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्याचा हा निर्णय वेस्ट इंडिजच्या स्फोटक फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला.

पूरनचे 31 चेंडूंत शतक
कर्णधार पूरनने अवघ्या 31 चेंडूंत शतक पूर्ण केले, जे या लीगमधील आतापर्यंतचे सर्वात जलद शतक ठरले आहे. त्याने 13 षटकार आणि 5 चौकार मारले. तो 33 चेंडूंमध्ये 106 धावा करत बाद झाला. त्याआधी न्यूयॉर्कला दुसऱ्या षटकातच पहिला धक्का बसला होता. त्यानंतर पूरनने क्विंटन डी कॉकसोबत धमाकेदार फलंदाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूंत 118 धावांची भागीदारी केली.

पोलार्डचे 1000 षटकार पूर्ण
डी कॉक बाद झाल्यानंतर पोलार्डचे वादळ आले. त्याने 25 चेंडूंत एक चौकार आणि 8 षटकारांच्या सहाय्याने 64 धावा केल्या. त्यादरम्यान त्याने टी 20 क्रिकेटमधील 1000 षटकारही पूर्ण केले.

आतापर्यंत केवळ दोनच फलंदाजांनी 1000 टी 20 षटकार मारले आहेत. या यादीत पहिल्या स्थानावर वेस्ट इंडिजचाच दिग्गज फलंदाज, ख्रिस गेल आहे. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये 1056 षटकार मारले आहेत. आता पोलार्ड 1001 षटकारांसह 1000 षटकाराच्या क्लबमध्ये दुसऱ्या स्थानी आला आहे.

सामन्याची स्थिती
पूरनचे शतक आणि पोलार्डच्या वादळी अर्धशतकाने न्यूयॉर्कने 20 षटकांत 9 विकेट्स गमात 266 धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात वॉशिंग्टनने सुरूवातीच्या 10 धावांवरच दोन विकेट्स गमावल्या होत्या, मात्र स्मिथ आणि अँड्रीस गॉस यांनी शतकी खेळी करत दोन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या न्यूयॉर्कला स्पर्धेतून बाहेर काढले.

वॉशिंग्टनने टी 20 च्या इतिहासातील सर्वात यशस्वी ‘रन चेज’ (लक्ष्य गाठण्याची कामगिरी) करत इतिहास रचला. स्मिथने 48 चेंडूंत 110* धावा आणि गॉसने 51 चेंडूंत 132 धावा केल्या. दोघांच्या या भन्नाट कामगिरीमुळे वॉशिंग्टनने 18.4 षटकांतच लक्ष्य गाठले.

वॉशिंग्टनचा पुढील सामना 17 जुलैला सॅन फ्रान्सिस्को युनिकार्नशी आहे. यामधील जो संघ जिंकेल तो रविवारी (19 जुलै) होणाऱ्या अंतिम सामन्यात लॉस एजेंलिस नाईट रायडर्सशी दोन हात करेल. (MLC 2026 Washington Freedom vs MI New York Nicholas Pooran 31 ball fastest century in major league cricket history kieron pollards1000 t20 sixes)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---