शनिवारी (13 मे) 16व्या आयपीएल हंगामातील 58वा सामन सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. मार्कस स्टॉयनिस, प्रेरक मांकड आणि निकोलस पूरन लखनऊसाठी मॅच विनर ठरले. दुसरीकडे हैदराबादसाठी फिरकीपटू अभिषेक शर्मा चांगलाच महागात पडला.
अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने तीन षटकात 42 धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. आपल्या कोट्यातील पहिल्या दोन षटकांमध्ये अभिषने 11 धावा खर्च केल्या होत्या. पण तिसऱ्या षटकात त्याची चांगलीच धुलाई झाली. निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी मिळून त्यांचा अभिषेकचा चांगलाच घाम काढला. लखनऊच्या डावातील 16व्या षटकात अभिषेकने तब्बल 31 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर मार्क स्टॉयनिसने षटकार मारल्यानंतर पुढचा चेंडू अभिषेने वाईड टाकला. त्यानंतर षटकातील दुसरा चेंडूही अभिषेने षटकारासाठी खेळला.
स्टॉयनिस यावेळी जबरदस्त फॉर्ममध्ये असला, तरी तिसऱ्या चेंडूवर त्याने चुकीचा शॉट खेळला आणि अब्दुल समदच्या हातात झेलबाद झाला. स्टॉयनिसच्या विकेटनंतर निकोलस पूरन फलंदाजीला आला. खेळपट्टीवर डावातील सलग तीन षटकार मारत पूरनने आश्चर्याचा धक्काच दिला. अभिषेक शर्मासाठी हे षटक एखाद्या भयानक स्वप्नासारखेच म्हणता येईल.
https://t.co/cgBU4wiSkz pic.twitter.com/21pddjmqIA
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2023
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकांमध्ये हैदराबादने 6 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने 19.2 षटकात 3 बाद 185 धावा केल्या आणि सामना नावावर केला. निकोलस पूरनने अवघ्या 13 चेंडूत 44* धावा कुटल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 338.46 होता. स्टॉयनिसने 25 चेंडूत 40, तर प्रेरकने 45 चेंडूत 64* धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
Nicholas Pooran is a crazy striker – 6,6,6 to start his innings. pic.twitter.com/7QBxZayrx2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 13, 2023
या विजयानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हंगामात आतापर्यंत खेळल्या 12 पैकी 6 सामने लखनऊने जिंकले आहेत, तर एक सामना अनिकाली राहिल्याने संघाकडे 13 गुण आहेत. अशात प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्सकडे संधी आहे. पाचव्या क्रमांकावरील राजस्तानसाठी मात्र आता पुढचा मार्ग खडतर होताना दिसतो. राजस्थानने देखील आतापर्यंत 12 सामने खेळले असून 6 विजय मिळवले आहेत. हैदराबाद संघ या पराभवानंतर 9व्या क्रमांकावर घसरला असून प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे. 11 पैकी 7 सामन्यांमध्ये हैदराबादने पराभव स्वीकारला असून त्यांच्याकडे 8 गुण आहेत. (Nicholas Pooran and Marcus Stoinis Scored 31 runs with 5 sixes in Abhishek Sharma’s over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या सामन्यात दिसणार गुजरात टायटन्सचा नवीन लूक! अशी आहे हार्दिकच्या संघाची नवीन जर्सी
आयपीएल लिलावात ‘झिरो’ ढरलेले पाच भारतीय दिग्गज, पण आता मैदानात ठरत आहेत ‘हिरो’