वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू निकोलस पूरनने (Nicholas Pooran) टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्रिनिदादमध्ये (27 सप्टेंबर) रोजी त्याने एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड केला. कॅरेबियन प्रीमियर लीग (caribbean premier league 2024) मध्ये बार्बाडोसविरुद्धच्या सामन्यापूर्वी हा रेकाॅर्ड आपल्या नावावर करण्यासाठी त्याला 5 धावांची गरज होती. दरम्यान पूरनने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला (Mohammed Rizwan) मागे टाकले.
निकोलस पुरनने (Nicholas Pooran) या सामन्यात 15 चेंडूत 27 धावा केल्या. त्याला नवीन उल हकने (Naveen Ul Haq) बाद केले. पूरनने 2024च्या टी20 क्रिकेटमध्ये 2,059 धावा केल्या आहेत. त्याने रिझवानचा 2021 मध्ये केलेला 2,036 धावांचा रेकाॅर्ड मोडला. टी20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 2,000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत या दोघांची नावे आहेत.
निकोलस पूरनच्या (Nicholas Pooran) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने वेस्ट इंडिजसाठी 61 एकदिवसीय, 98 टी20 सामने खेळले आहेत. 61 एकदिवसीय सामन्यात त्याने 39.66च्या सरासरीने फलंदाजी करताना 1,983 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 118 आहे. दरम्यान त्याने 11 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले. 98 टी20 सामन्यात त्याने 27.43च्या सरासरीने 2,185 धावा केल्या आहेत. टी20 मध्ये त्याच्या नावावर 13 अर्धशतके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
5 क्रिकेटपटू ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, नंतर फलंदाजीत कमावलं नाव
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत केन विल्यमसनच्या नावे नकोसा विक्रम! काय घडलं जाणून घ्या