आयपीएमध्ये आत्तापर्यंत अनेकदा क्रिकेटपटूंनी अफलातून क्षेत्ररक्षण केलेले पहायला मिळाले आहे. असेच किंग्स इलेव्हन पंजाबचा क्षेत्ररक्षक निकोलस पूरनने रविवारी(२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध शानदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. त्याच्या क्षेत्ररक्षणाचे सध्या मोठ्याप्रमाणात कौतुक होत आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स २२४ धावांच्या आव्हानाच पाठलाग करत होते. यावेळी ८ व्या षटकात राजस्थानकडून संजू सॅमसन फलंदाजी करत होता, तर पंजाबकडून मुरुगन अश्विन गोलंदाजी करत होता. अश्विनने टाकलेल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सॅमसनने पुलचा फटका खेळत डिप मिड-विकेटच्या दिशेने चेंडू भिरकवला.
हा चेंडू षटकारच जाईल असे वाटत होते, परंतु त्याचवेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या पुरनने सीमारेषेवर हवेत उडी घेतली आणि स्वत:ला झोकून देत डाव्या हाताने चेंडू पकडला. त्यानंतर काही सेंकदातच त्याने तो मैदानावर पडण्याआधी हवेत असताना चेंडू सीमारेषेपासून मैदानात फेकला. यावेळी सॅमसन बाद झाला नसला तरी षटकार जाण्यापासून वाचवण्यात पूरनला यश आले.
पूरनचे असे अफलातून क्षेत्ररक्षण पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराही आश्चर्य वाटले. त्याने ट्विट करत पूरनचे कौतुक केले. त्याने म्हटले की ‘माझ्या आयुष्यात पाहिलेले हे सर्वोत्तम क्षेत्ररक्षण होते. अविश्वसनीय!’
https://twitter.com/sachin_rt/status/1310258625584271361
एवढेच नाही तर चाहत्यांसह अनेक दिग्गजांनीही पूरनचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/irbishi/status/1310257198560354306
https://twitter.com/Riteishd/status/1310260006470561793
https://twitter.com/cricketaakash/status/1310256968314093570
https://twitter.com/cricketaakash/status/1310256968314093570
रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबने मयंक अगरवाल(१०६) आणि केएल राहुलच्या(६९) खेळींच्या जोरावर २० षटकात २ बाद २२३ धावा केल्या होत्या आणि राजस्थानला २२४ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने १९.३ षटकात पूर्ण करत सर्वांना आश्चर्यचकीत केले. राजस्थानकडून सॅमसनने सर्वाधिक ८५ धावा केल्या. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथने ५० धावा आणि राहुल तेवतियाने आक्रमक खेळी करताना ७ षटकारांसह ५३ धावा केल्या.






