आयपीएल 2023चा मिनी लिलाव कोची येथे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. त्याचवेळी वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार व आक्रमक फलंदाज निकोलस पूरन याच्यावर पुन्हा एकदा पैशाचा पाऊस पडला. सनरायझर्स हैदराबाद संघाने रिलीज केल्यानंतर या लिलावात लखनऊ सुपरजायंट्स संघाने त्याच्यावर तब्बल 16 कोटींची बोली लावली. विशेष म्हणजे तो आयपीएल इतिहासात सर्वात महागडा विकला गेलेला वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ठरला.
Congratulations to @nicholas_47
He will now play for @LucknowIPL #TATAIPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/ufrPAZawaW
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
पुरन हा मागील दीड वर्षापासून अत्यंत खराब कामगिरी करताना दिसला. आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्यावर 10 कोटींपेक्षा जास्त बोली लावली होती. मात्र, त्याची कामगिरी अपेक्षित राहिली नाही. त्याचवेळी त्याच्याकडे वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व देखील सोपविण्यात आलेले. त्यावेळी जवळपास सर्वच द्विपक्षीय मालिकेत वेस्ट इंडीजला पराभव स्विकारावा लागलेला. तर, नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिज संघ त्याच्या नेतृत्वात पात्रता फेरीच्याही पुढे जाऊ शकला नव्हता. यानंतर त्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला.
त्याची या लिलावात आधारभूत किंमत 2 कोटी रुपये होती. सुरुवातीला राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल्स यांनी त्याच्यासाठी बोली लावली. राजस्थानने सात कोटींवर माघार घेतल्यानंतर लखनऊ सुपरजायंट्स संघाने अत्यंत शांतपणे त्याच्यावर बोली लावणे सुरू केले. त्यांनी अखेरीस 16 कोटींची सर्वात मोठी बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
नुकत्याच झालेल्या अबुधाबी टी10 लीगमध्ये त्याचे कामगिरी चमकदार राहिलेली. तसेच त्याच्या नेतृत्वात डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाने विजेतेपदही आपल्या नावे केलेले. त्याचाच फायदा त्याला या लिलावात सांगण्यात येत आहे.
(Nicholas Pooran Sold In 16 Crore In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोटा झाला रे! आयपीएल 2023च्या लिलावात रहाणेला 50 लाखांचा फटका, चेन्नईने घेतलं फक्त ‘एवढ्या’ लाखात
मोठी बातमी! दीड कोटींचा नवखा इंग्लिशमन 13.25 कोटीत हैदराबादच्या चमूत; वाचा कोण आहे तो