---Advertisement---

‘आता मी निश्चिंत…’, दुसऱ्या टी-२० विजयानंतर पूरनने सोडला सुटकेचा निश्वास

---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान खेळला गेलेला दुसरा टी-२० सामना रोमांचक ठरला. हा सामना सुरू होण्यापूर्वीच वेळेत झालेला बदल सामन्याची उत्कंठा वाढवून गेला. याशिवाय अगदी शेवटच्या षटकापर्यंत यासामन्याचा थरार सुरूच राहिला. या थरारक सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला पराभूत करत मालिकेत १-१ची बरोबरी मिळवली. यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने महत्वाचे विधान केले आहे.

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात संघाचे पुनरागमन केल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने यजमानांना १३९ धावांचे लक्ष्य दिले, ते विंडीज संघाने सहज गाठले. एकदिवसीय मालिका आणि पहिला टी-२० सामना गमावल्यानंतर कॅरेबियन संघाचा कर्णधार खूपच आनंदी दिसत होता. यासोबतच तो या सामन्याचा नायक ओबेद मॅकॉयवरही खूप प्रभावित झाला होता.

निकोलस पूरनने विजयानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला
मिडल ऑर्डर फ्लॉप असूनही पूरनसाठी हा विजय खूप महत्त्वाचा होता. त्याचवेळी, या विजयानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनची मोठी प्रतिक्रिया आली. वेस्ट इंडिजचा कर्णधार म्हणाला की, “मी आता सुटकेचा श्वास घेऊ शकतो. आमच्यासाठी हा कठीण विजय होता. आम्ही काही हातातले सामने गमावले. ओबेद हुशार आहे त्याने खेळपट्टी आणि परिस्थितीचा चांगला उपयोग केला. विजय हा विजय असतो. माझा विश्वास आहे की अधिक चांगल्या फलंदाजांनी टी-२० मध्ये जास्त वेळ खेळला पाहिजे. हेटमायर स्वतः अधिक जबाबदारी घेऊ शकतो.”

वेस्ट इंडिजच्या विजयात ओबेद मॅकॉयने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने शानदार गोलंदाजी करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. त्याचवेळी सामना संपल्यानंतर पूरनने मॅचनंतरच्या सेरेमनीमध्ये ओबेदचे कौतुक केले. विजयी संघाचा कर्णधार म्हणाला की, “किंग ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्याने आमच्यासाठी सामना जिंकायला हवा होता. पण त्यातून तो शिकेल अशी आशा आहे. थॉमसने दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आणि घरच्या मैदानावर ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध केले. ओबेद छान आहे आणि त्याने आज उत्तम काम केले आहे. तो फक्त आमच्यासाठी विकेट घेत राहिला. तो म्हणाला की तो दिनेश कार्तिकला पूर्ण आणि सरळ स्टंपवर टाकेल आणि ते कामी आले. डाव्या हाताच्या अ‍ॅक्शनसह त्याला संघात घेणे आमच्यासाठी चांगले आहे.”

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने टी-२० सामन्यांमध्ये चार षटकांत ६/१७ अशी सर्वोत्तम गोलंदाजी केल्याने ओबेड मॅककॉयने भारताचा डाव केवळ १३८ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने शानदार बचाव केला, ब्रँडन किंगने ५२ चेंडूत ६८ आणि डेव्हन थॉमसने १९ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. या दोन्ही संघांमध्ये तिसरा टी-२० सामना मंगळवारी (२ ऑगस्ट) रात्री ९.३० वाजता खेळवला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

…म्हणून कर्णधार रोहितने भुवनेश्वरला दिली नाही शेवटची ओव्हर, जाणून घ्या खरे कारण

दुसऱ्या टी२० नंतर आता तिसऱ्या सामन्यालाही उशीर, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार मॅच?

मेकॉय पुढे टीम इंडियाची वाताहात! दुसरा टी२० जिंकत यजमानांनी मालिका आणली बरोबरीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---