इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटन हा पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टिका केल्यामुळे चर्चेत आला आहे. कॉम्पटनने २०१२सालच्या भारत दौऱ्याच्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, “जेव्हाही तो विराटच्या एक्स गर्लफ्रेंडशी बोलत असायचा, तेव्हा विराटला ते अजिबात आवडत नव्हते. मग, मी फलंदाजी करण्यासाठी मैदानावर गेल्यावर की तो नेहमी मला काही ना काही म्हणत असायचा.” एज आणि स्लेजेस क्रिकेट पॉडकास्टशी बोलताना कॉम्पटनने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
कॉम्पटन म्हणाला की, “कोहलीला वाटत असायचे की मी त्याच्या प्रेमिकासोबत सतत बोलतो. मी फक्त तिला सहज बोललो आणि अशाप्रकारे ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचली. माझ्या मते विराटला हे अजिबात आवडले नव्हते. त्यामुळे मी फलंदाजीसाठी मैदानावर गेलो की, तो मला सांगायचा की ती माझी प्रेमिका आहे. परंतु, ती मुलगी तर म्हणत होती की, कोहली माझा एक्स बॉयफ्रेंड होता.”
“हे सर्व काही त्यावेळेला खूप मस्त वाटत होते. आमच्या इंग्लंड शिबीरमधल्या खेळाडूंनी विराटची ही गोष्ट पकडली होती आणि आम्ही त्या गोष्टीचा प्रसार करायचे काम करत होतो. जेणेकरुन विराटचे लक्ष विचलित व्हावे,” असे कॉम्पटन पुढे बोलताना म्हणाला.
विराटने २०१८मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले आहे.
२०१२साली इंग्लंड भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा दोन्ही संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेत भारत २-१ अशा फरकाने पराभूत झाला होता. अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ विकेट्सने विजय मिळवत भारताने चांगली सुरुवात केली होती. परंतु, मुंबई येथे झालेला दुसरा कसोटी सामना भारताने १० विकेट्सने गमावला होता. कोलकाता येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवला होता. तर, नागपुर येथील चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिल्याने इंग्लंडने २-१ अशा फरकाने भारताला पराभूत केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
विक्रमात सचिनच्या पुढे होता हा खेळाडू, परंतु चर्चा व्हायची ड्रग्ज घेण्याची
न्यूझीलंडमध्ये होणारा 2021 सालचा विश्वचषक जिंकून मी निवृत्त होईन
धोनी चित्रपटाची तयारी करताना सुशांतची फ्रक्चर झाली होती २ बोटं, कोच…