तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणीनंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले नाव कोरले. ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर्स असोसिशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या स्पार्टन मुंबई श्री २०२३ च्या स्पर्धेत निवेशने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. त्याने ७० आणि ७५ किलो वजनगटातील विजेते अनुक्रमे उमेश गुप्ता आणि रोहन गुरव यांना आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. त्याचा विजय अगदीच एकतर्फी झाला. निलेशकडून पराभूत झालेल्या उमेश गुप्ताला (यु.जी. फिटनेस) तिसरे स्थान देण्यात आले तर बाल मित्र जिमचा रोहन गुरव उपविजेता ठरला.
‘१००’ हा ट्रंक नंबर असणार्या निलेशने आपल्याकडे असणार सौष्ठव हे यावेळी शंभर नंबरी सोने असल्याचा दाखला दिला. त्याच्या भीमकाय देहयष्टीने इतर गटातील सात विजेत्यांना अक्षरश: खुजे बनविले. निलेशला यंदा कोणतेच आव्हान असणार नाही याची कल्पना खेळातील जाणकार प्रेक्षकांना’ प्री-जजिंग’च्या दरम्यानच आली होती. निलेश उंची, त्याच्या स्नायूंचे मोठे आकारमान आणि खास करून अप्पर बॉडीमुळे तो स्टेजवर येताच ‘हाच तो विजेता’ असे प्रेक्षकांचे मत शंभर टक्के बनले. ‘हंड्रेड… हंड्रेड… हंड्रेडच्या जयघोषाने अंधेरीचे शहाजीराजे क्रीडा संकुल दणाणून गेले. निलेशच्या एकूण सौष्ठवापैकी त्याच्या पाठीचा म्हणजे बॅकचा जो नजारा होता तो क्वचितच पाहावयास मिळणारा असा होता. त्याने केलेल्या मेहनतीचे ते फलित होते.
त्याआधी गटातल्या लढतीत उमेश गुप्ता त्याच्या ७० किलो गटामध्ये निर्विवाद विजेता होता, तीrच गोष्ट ७५ किलो गटात रोहन गुरवची. उमेशच्या पिंडर्या पट (मांड्या) आणि हॅमस्ट्रिंग (मांडीचे मागचे स्नायू) पाहण्याजोगे होते. अनिकेतचे प्रमाणबद्ध शरीर त्याला अव्वल स्थान देऊन गेले. ५५ किलो गटात ओंकार आंबोळकर, ६० किलोत दिपक चौहान, ६५ किलोत आकाश घोरपडे, ८० किलोत गणेश पेडामकर आणि ८५ किलोत अनिकेत पाटील यांनी गटविजेतेपद संपादले. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स्च्या लढतीत या पाचही खेळाडूंना सात पोझेसनंतर बाहेर काढण्यात आले आणि जेतेपदाची लढत दगडे, गुरव आणि गुप्ता यांच्यात रंगली. या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार सोहळा शरीरसौष्ठव संघटनेचे अमोल कीर्तीकर, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनिल शेगडे, विजय झगडे, भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर आणि स्पर्धेचे पुरस्कर्ते ऋषभ चोक्सी यांच्या उपस्थितीत पार पडला.
मुंबई शरीरसौष्ठव संघटनेने पेलले शिवधनुष्य
गेली दोन वर्षे मुंबई श्री होऊ न शकल्यामुळे यंदा स्पर्धेला कुणी पुरस्कर्ताच मिळत नव्हता. तेव्हा मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि सरचिटणीस राजेश सावंत, सुनील शेगडे यांनी स्पर्धा दणक्यातच करायची, असे मनाशी ठरवत मुंबई श्रीची जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेतली. सर्वप्रथम त्यांनी स्पार्टन न्यूट्रिशनला पुन्हा एकदा मुख्य प्रायोजक करण्यात यश मिळविले आणि मग एकेक करत सर्व प्रायोजकांना, हितचिंतकांना गाठून स्पर्धेला लागणारा निधी उभारला आणि मुंबई श्रीचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले.
महिलांमध्ये हर्षदा सरस
अलिकडच्या काळात महिला व्यायामाकडे वळू लागल्याने त्यांच्यासाठी घेतल्या जाणार्या स्पर्धा महिला वर्गाला प्रेरणादायी ठरु लागल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये महिलांचे वाढते प्रमाण आणि प्रत्यक्ष सहभाग लक्षणीय ठरत आहे. महिलांच्या शरीरसौष्ठवामध्ये हर्षदा पवार (हर्क्युलस फिटनेस) हिने आपले वर्चस्व राखताना आपल्याच जिममधील किमया बेर्डेला मागे टाकले. तर महिलांच्या फिजिक स्पोर्टसमध्ये रेणुका जनौतीने बाजी मारली. यामध्ये स्पर्धकांच्या शरीराचे एकूणच ‘सौंदर्य’ याला महत्त्व असते.
अलंकार, अनिकेतला यश
• आजकाल ‘आयटी’ क्षेत्रात कॉम्प्युटर’च्या विळख्यात अडकलेला युवा वर्ग व्यायामाला महत्त्व देऊ लागला आहे. याचे प्रमाण मेन्स फिजिक स्पर्धेमध्ये पाहावयास मिळाले. १७० सेंटिमीटर आणि १७० सेंटिमीटरवरील गटामध्ये अनिकेत सावंत (बॉडी वर्कशॉप) आणि अलंकार पिंगळे (दांडेश्वर व्यायामशाळा) यांनी कडव्या लढती अंती विजेतेपद जिंकली. आकाश जाधव आणि मिनेश ठक्कर (मांसाहेब जिम) उपविजेते ठरले.
मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम निकाल
महिला (फिजीक स्पोर्ट्स) : १. रेणुका जनौती (फॉरच्युन फिटनेस), २. शीतल वाडेकर (सिल्व्हर स्पोर्ट्स क्लब), ३. निशरीन पारीख (वैयक्तिक), ४. वीणा चौहान (बॉडी वर्कशॉप), ५. प्रतिभा कांबळे (इ लाइट)
पुरूष (फिजीक स्पोर्ट्स) : १७० सेमी- १. अनिकेत सावंत ( बॉडी वर्कशॉप), २. आकाश जाधव ( बॉडी वर्कशॉप), ३. अनिकेत चव्हाण ( रिगस फिटनेस); १७० सेमीवरील : १. अलंकार िंपगळे ( श्री दांडेश्वर व्या.), २. मितेश ठक्कर (मांसाहेब जिम), ३. प्रशांत लाड (बॉडी वर्कशॉप), ४. जाफन अन्सारी (रिंक स्टील फिटनेस), ५. निलेश गुरव (मांसाहेब)
महिला शरीरसौष्ठव : १. हर्षदा पवार (हर्क्युलस फिटनेस), २. किमया बेर्डे ( हर्क्युलस फिटनेस), ३. श्रद्धा ढोके (बिवो वॉर्म जिम), ४. शर्वरी गोडसे ( फाइव्हस्टार फिटनेस), ५. गौतमी सोनावणे (अपूर्वा जिम)
पुरूष शरीरसौष्ठव
५५ किलो : १. ओंकार आंबोळकर (बॉडी वर्कशॉप), २. नितीन शिगवण (फॉरच्युन फिटनेस), ३. नितेश कोळेकर (परब फिटनेस), ४. मुजीब कुरेशी (शाहु नगर), ५. गौरव तेली (स्टील बॉडी वर्कशॉप);
६० किलो : १. दिपक चौहान (बॉडी वर्कशॉप), २. गणेश पारकर (परब फिटनेस), बप्पन दास (डी.एन. फिटनेस), ४. कल्पेश सौंदळकर (सर्वेश्वर फिटनेस), ५. प्रशांत घोलम (स्ट्रेंथ जिम);
६५ किलो : १. आकाश घोरपडे (बॉडी वर्कशॉप), २. आनंद पांडे ( सालम जिम), ३. अरूण पाटील (सालम जिम), ४. सुमीत यादव (बॉडी वर्कशॉप), ५. शैलेश यादव ( ग्रेस फिटनेस);
७० किलो : १. उमेश गुप्ता (यू.जी. फिटनेस), २. संदीप सावले (डी.एन. फिटनेस), ३. विशाल धावडे (बालमित्र जिम), ४. विवेक गायकवाड (आर.एम.भट), ५. नदीम अन्सारी (सावरकर जिम);
७५ किलो : १. रोहन गुरव (बाल मित्र जिम), २.आशीष लोखंडे ( परब फिटनेस), ३. सिद्धांत यादव (आर्यन पॅराडाईज), ४. मकरंद दहिबावकर (जे नाईन फिटनेस), ५. छलदुरई आनंद राज (सालम जिम);
८० किलो : १. गणेश पेडामकर (सर्वेश्वर जिम), २. विशाल गिजे ( बालमित्र जिम), ३. अक्षय खोत (परब फिटनेस), ४. विकास म्हापसेकर (हर्क्युलस जिम), ५. रोहन कांदळगावकर ( परब जिम);
८५ किलो : १.अनिकेत पाटील (सावरकर जिम), २. दीपक प्रधान (आर.एम.भट), ३. अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन जिम), ४. अभिषेक माशेलकर (जे नाईन फिटनेस), अक्षय शिंदे आर.एम. भट);
८५ किलोवरील : १. निलेश दगडे (परब फिटनेस), २. दिपक तांबिटकर ( फॉरच्युन फिटनेस), ३. सुशांत पवार (माऊंटन फिटनेस), ४. नितांत कोळी (हर्क्युलस जिम), ५. सुशांत रांजणकर (सालम जिम).
मुंबई श्री विजेता : निलेश दगडे (परब फिटनेस),
उपविजेता : रोहन गुरव (बाल मित्र जिम),
द्वितीय उपविजेता : उमेश गुप्ता (यू.जी. फिटनेस).
(Nilesh Dagde won the title of Spartan Mumbai Shri)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंच नितीन मेननचं स्वप्न खरं होणार! पहिल्यांदाच करणार ‘या’ महत्वाच्या मालिकेत अंपायरिंग
अविस्मरणीय खेळी: गांगुलीने ‘तो’ निर्णय घेतला अन् धोनीने पहिलं-वहिलं शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं