इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपली दावेदारी ठोकली आहे. तरीही मुंबई इंडियन्सनचा संघ या स्थानासाठी आपले नशीब आजमावून पाहिल. दरम्यान शुक्रवारी (८ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत इतिहास घडणार आहे. जे आजवर झाले नाही ते यादिवशी घडणार आहे.
शुक्रवारी (८ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत एकाच दिवशी एकाच वेळी दोन सामने खेळले जाणार आहेत. आयपीएल स्पर्धेच्या १४ वर्षांच्या इतिहासात यापूर्वी असे कधीच झाले नाहीये. या दिवशी केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासोबत होणार आहे. हा सामना शेख जायद स्टेडियमवर पार पडेल. तर दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सामना रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघासोबत होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता हे सामने होणार आहेत.
एकाच वेळी दोन सामने खेळवण्यात येणार असल्यामुळे स्टार स्पोर्टसच्या प्रसरकांनी देखील वेगळ्या योजना आखल्या आहेत. जाणून घ्या कुठे पाहू शकाल हे दोन्ही सामने.
इथे पाहू शकाल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामना
स्टार स्पोर्ट्स १ (एसडी + एचडी), स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (एसडी + एचडी), १ (एसडी + एचडी), स्टार स्पोर्ट्स १ तमिळ, स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स १ कन्नड़
इथे पाहू शकाल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना
स्टार स्पोर्ट्स २ (एसडी+एचडी), स्टार स्पोर्ट्स ३, स्टार गोल्ड २ एसडी, स्टार मा गोल्ड, स्टार विजय सुपर, स्टार सुवर्णा प्लस आणि स्टार गोल्ड सेलेक्ट (एसडी+एचडी)
साखळी फेरीतील शेवटचा दिवस हा अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोण असेल? याचा निकाल यादिवशी लागणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघाने मिळवलेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. मुंबई इंडियन्स संघाला जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध २०० पेक्षा अधिक धावा करून १७१ पेक्षा अधिक धावांनी पराभूत करावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘हे’ असतील पंच आणि सामना रेफरी, भारताच्या फक्त एकाच अंपायरला संधी
गोलमाल है भाई…! एकीकडे पटापट विकेट्स जात असताना राजस्थानच्या ताफ्यात सुरू होता भलताच गोंधळ
टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानचा रडीचा डाव, जर्सीवरुन हटवले भारताचे नाव; फोटो व्हायरल