---Advertisement---

मुंबई वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 8, 2021 1:56 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेतील ५५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. हा सामना अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण मुंबई इंडियन्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघाला मागे टाकून प्लेऑफ गाठायचे असेल तर हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा करून १७१ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ आपला सर्वोत्कृष्ट संघ घेऊन मैदानात उतरेल. तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यासाठीचा ड्रीम ११ संघ कसा असेल?

या सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सामना क्रमांक – ५५
दिनांक – ८ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण – शेख जायद स्टेडियम, अबू धाबी

या सामन्यासाठी असा असू शकतो मुंबई इंडियन्सचा संभावित ११ खेळाडूंचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव,सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या,जिमी नीशम, नाथन कूल्टर-नाइल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

या सामन्यासाठी असा असू शकतो सनरायझर्स हैदराबादचा संभावित ११ खेळाडूंचा संघ 
केन विलियमसन (कर्णधार), जेसन रॉय, वृद्धिमान साहा, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, उमरान मलिक आणि सिद्धार्थ कौल.

या सामन्यासाठी हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम ११ संघात
यष्टिरक्षक – ईशान किशन
फलंदाज – रोहित शर्मा, केन विलियमसन, जेसन रॉय
अष्टपैलू खेळाडू – कायरन पोलार्ड, जेसन होल्डर, जिमी नीशम
गोलंदाज – राशिद खान, भुवनेश्वर कुमार, नाथन कूल्टर-नाइल, जसप्रीत बुमराह
कर्णधार – रोहित शर्मा
उप कर्णधार – जेसन रॉय

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलच्या १४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी भिडणार ४ संघ, असे पाहता येतील सामने

टी२० विश्वचषकात दुखापतग्रस्त चक्रवर्तीचा रिप्लेसमेंट कोण? ‘या’ २ नावांची होतेय भरपूर चर्चा

टी२० विश्वचषकात ‘हे’ असतील पंच आणि सामना रेफरी, भारताच्या फक्त एकाच अंपायरला संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---