– अनिल भोईर
दिवसेंदिवस कबड्डीची लोकप्रियता वाढत आहे. भारतात क्रिकेटनंतर कबड्डी हा खेळ सर्वात जास्त पाहिला जातो. प्रो कबड्डी सुरु झाल्यापासून कबड्डी वाढू लागली आहे.
प्रो कबड्डीनंतर आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पहाण्याऱ्यांची संख्या वाढली आहे. भारतात गेली ६५ वर्ष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होत असून आता याविषयी जाणून घेण्याऱ्या कबड्डी रसिकांची संख्या वाढत आहे.
आतापर्यंत झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा विषयी माहिती कबड्डी रसिकांपर्यंत पोहचत नव्हती. मागील १-२ वर्षांपासून कबड्डी स्पर्धांविषयी माहिती कबड्डी रसिकांना मिळू लागली आहे.
दुबई येथे झालेल्या कबड्डी मास्टर्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेने कबड्डीच्या नवीन हंगामाची (२०१८-१९) सुरुवात झाली. कबड्डी मास्टर्स भारतीय संघाने जिंकून नवीन हंगामाची चांगली सुरुवात केली.
कबड्डी रसिकांसाठी आता पुढील ९ महिने कबड्डी स्पर्धाचा थरार पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा, आशियाई गेम्स, प्रो कबड्डी आणि अखेरीस वर्ल्ड कप होणार आहे.
या सर्व स्पर्धांविषयी थोडक्यात कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
राष्ट्रीय स्पर्धा
३० वी किशोर/किशोरी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१८
आयोजक: बिहार कबड्डी असोसिएशन
ठिकाण: पटना
कालावधी: २ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर २०१८
४५ वी कुमार/कुमारी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१८
आयोजक: पश्चिम बंगाल (AKFI Unit)
ठिकाण: कोलकत्ता
कालावधी: १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१८
६६ वी वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१८
आयोजक: आंध्र कबड्डी असोसिएशन
ठिकाण: कुरनुल
कालावधी: १९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१८
६६ वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१८
आयोजक: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
ठिकाण: अजून ठरलं नाही.
कालावधी: अजून ठरलं नाही.
६ वी कुमार/कुमारी फेडरेशन कप स्पर्धा २०१९
आयोजक: उत्तर प्रदेश कबड्डी असोसिएशन
ठिकाण: काकरी प्रोजेक्ट, सोनभद्रा
कालावधी: फेब्रुवारी २०१९
४ थी वरीष्ठ गट फेडरेशन कप स्पर्धा २०१९
आयोजक: कबड्डी असोसिएशन ऑफ हिमाचल
ठिकाण: शिमला
कालावधी: अजून ठरलं नाही.
११ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धा २०१९
आयोजक: उत्तराखंड कबड्डी असोसिएशन
ठिकाण: हरिद्वार
कालावधी: अजून ठरलं नाही.
११ वी व्यवसायिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०१९
आयोजक: कर्नाटका अम्युचर कबड्डी असोसिएशन
ठिकाण: बंगळुरू
कालावधी: अजून ठरलं नाही.
प्रो कबड्डी लीग २०१८ (पर्व ६)
आयोजक: मशाल स्पोर्ट्स
ठिकाण: देशातील १२ शहरात
कालावधी: ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९
– आंतरराष्ट्रीय स्पर्धा
१८ वी आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८
आयोजक: OCA (ऑलिम्पिक कौंसिल ऑफ आशिया)
ठिकाण: जकार्ता
कालावधी: १९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०१८
कबड्डी वर्ल्ड कप २०१९
आयोजक: IKF
ठिकाण: अजून ठरलं नाही
कालावधी: फेब्रुवारी-मार्च २०१९