---Advertisement---

‘या’ धुरंधरावर सीएसकेचे लक्ष! तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये अवघ्या ५ सामन्यात चोपल्यात २९६ धावा

On: रविवार, ऑगस्ट 1, 2021 11:14 AM
---Advertisement---

सध्या सर्वत्र तामिळनाडू प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेतील युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्येक सामन्यात एखादा गोलंदाज किंवा फलंदाज असतोच जो चमकदार कामगिरी करतो. परंतु या यादीत सर्वोच्च स्थानी कोण असेल तर, तो म्हणजे साई सुदर्शन. या युवा फलंदाजाने आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आतापर्यंत या स्पर्धेत साई सुदर्शनने ज्याप्रकारे कामगिरी केली आहे. त्यावरून हे तर नक्कीच आहे की, निवडकर्ते त्याच्यावर लक्ष ठेवून असतील. या १९ वर्षीय फलंदाजाने तामिळनाडू क्रिकेट लीग स्पर्धेत आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत, ज्यामधे त्याने २९६ धावा केल्या आहेत. ज्याप्रकारे त्याने विस्फोटक फलंदाजी केली आहे. (Nineteen years old sai sudarshan running in golden form with consecutive good scores)

त्यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, त्याला आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावात कुठला ना कुठला संघ नक्की संधी देईल. त्यातही चेन्नई सुपर किंग्ज त्याच्यासाठी बोली लावण्याची शक्यता जास्त आहे.

तामिळनाडू क्रिकेट लीग स्पर्धेत लाइका कोवइ किंग्स संघाकडून खेळणाऱ्या या फलंदाजाने पहिल्याच सामन्यात ४३ चेंडुंमध्ये ८७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने ४३ चेंडूंमध्ये नाबाद ५७ धावांची खेळी केली होती. तर तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने अवघ्या २७ चेंडूत नाबाद ४० धावांची विस्फोटक खेळी केली होती. तर चौथ्या सामन्यात ५२ चेंडूत ६१ धावांची कुटल्या होत्या. तसेच शनिवारी (३१ जुलै) आईड्रीम तीरुपूर तमीजान्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३६ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ५१ धावांची खेळी केली होती.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1417176942667698178?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1417176942667698178%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Ftnpl-19-years-old-sai-sudharsan-running-in-golden-form-with-consecutive-good-scores-80677

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी लिलावाचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामुळे संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. ज्या संघाना मध्यक्रमात विस्फोटक फलंदाजाची आवश्यकता असेल. ते संघ साई सुदर्शनला आपल्या संघात घेण्याचा नक्की विचार करतील.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकासाठी हर्षा भोगलेंनी निवडला भारताचा संघ, ‘या’ सलामीवीराला ठेवले बाहेर

गेल्या १९ वर्षांत इंग्लंडमध्ये एकाही भारतीयाच्या बॅटमधून निघालं नाही द्विशतक, यंदा संपणार का हा दुष्काळ?

निकोलस पुरनची चिवट झुंज व्यर्थ, दुसऱ्या टी२०त पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर ७ धावांनी विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---