---Advertisement---

वडिलांना शेतीच्या कामात मदत करणाऱ्या नीरजने देशाला मिळवून दिले सुवर्णपदक; जाणून घ्या त्याच्याबद्दल खास गोष्टी

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 2:41 PM
Neeraj-Chopra
---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हरियाणाचा भालाफेकपटू नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तब्बल 13 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने 87.58 मीटर थ्रो करून सुवर्णपदक पटकावले. पात्रता फेरीतही नीरज त्याच्या गटात प्रथम क्रमांकावर होता.

नीरज चोप्रा हरियाणाच्या पानिपत जिल्यातील खांदरा गावचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 24 डिसेंबर, 1997 मध्ये झाला. त्याचे वडील सतीश कुमार शेती करतात. शेतीच्या उत्पन्नातून घरखर्च भागतो. नीरजने त्याचे शालेय शिक्षण चंदिगडमधून पूर्ण केले आहे. नीरजला शिक्षणासोबतच वडील आणि चुलत्यासोबत शेतातील कामेही करावी लागत असायची. ओवू हॉन हे नीरजचे सध्याचे प्रशिक्षक आहेत. नीरज आठवड्यात सहा दिवस सहा तास ट्रेनिंग करतो..

त्याने 2016 मध्ये पोलंडमध्ये झालेल्या आयएएफ जागतिक यु-20 स्पर्धेत 86.48 मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला भारतीय सैन्यात नायक सुभेदार (ज्युनियर कमीशन ऑफिसर) पद देण्यात आले.

अशाप्रकारे झाली नीरजच्या कारकिर्दीची सुरुवात
लहानपणी नीरजचे वजन खूप होते. म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे वजन कमी करण्यासाठी त्याला खेळायला सुरुवात करायला सांगितले. पानिपतच्या शिवाजी स्टेडिअममध्ये नीरजने भालाफेक खेळणाऱ्या खेळाडूंना पाहिले. त्यांना पाहून तो भालाफेक खेळाकडे आकर्षित झाला. तेव्हापासूनच नीरजने भालाफेक खेळायला सुरुवात केली.

सुवर्णपदक जिंकण्यासाठी नीरजने घेतले अपार कष्ट
नीरजचा पहिला विजय हा 2012 साली लखनऊमध्ये नॅशनल ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये मिळवला होता. त्या स्पर्धेत नीरजने 16 वर्षांखालील गटात 68.46 मीटर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम केला आणि सुवर्णपदक जिकले. 2013 च्या नॅशनल युथ चॅम्पियनशिपमध्ये नीरजने पुन्हा एकदा जोरदार प्रदर्शन केले. त्याने या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला आणि त्यावर्षी होणाऱ्या आयएएएफ वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपमध्ये स्थान पक्के केले.

ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप 2015 मध्ये नीरजने 81.4 मीटर भाला फेकत कनिष्ट गटातील विक्रम त्याच्या नावे केला. नीरज 2016 मध्ये प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याने ज्युनियर विश्व चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर भाला फेकत विश्वविक्रम बनवला आणि सुवर्णपदक जिंकले. 2018 मध्ये गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ खेळात नीरजने 86.47 मीटर भाला फेकत सुवर्णपदक मिळवले. याव्यतिरिक्त एशियन गेम 2018 मध्ये नीरजने त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन करत 88.6 मीटर भाला फेकला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज पात्रता फेरीतही प्रथम क्रमांकावर होता. त्याने पात्रता फेरीत सर्वात लांब थ्रो केला. त्याच्या पात्रताफेरीतील प्रदर्शनानंतर त्याला भालाफेक स्पर्धेतील सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात होते.

भालाफेक स्पर्धेत नीरजने रचला इतिहास
भालाफेक स्पर्धेत नीरज सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने त्याची पहिली फेक 87.3 मीटर केली. त्याने त्याची दुसरी फेक 87.58 मीटर केली आणि सुवर्णपदक मिळवले. भालाफेक स्पर्धेतील आणि ऍथलेटिक्स प्रकारातील हे भारताचे पहिले सुवर्णपदक आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-बिचारा कोहली! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडच्या प्रेक्षकांचा उर्मटपणा, ‘या’ गोष्टीवरून उडवली भरपूर खिल्ली

-रिषभच्या छोटेखानी खेळीचा ‘हा’ पाकिस्तानी दिग्गजची बनला चाहता, केलं तोंडभरुन कौतुक

-IND vs ENG: रोहितचा कसोटी संघातून कटणार पत्ता? ‘हा’ युवा खेळाडू राहुलसह करणार ओपनिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---