पॅरालिम्पिकमधून भारतासाठी आनंदाजी बातमी समोर येत आहे. बॅडमिंटनपटू नितेश कुमारने पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने पुरुष एकेरी बॅडमिंटन SL3 प्रकारात ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. एकंदरीत 2024 च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे नववे पदक आहे.
INDIA IS PROUD OF YOU, NITESH KUMAR 🫡
– An Inspirational story, 🥇 Medal in Paralympics…!!!!! pic.twitter.com/sWhsn8L3Au
— Johns. (@CricCrazyJohns) September 2, 2024
नितेश पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला होता.आता त्याने पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवून इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो आता तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण 9 पदके जिंकली आहेत. सध्याच्या गेम्समध्ये नितीश कुमार हे बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारे पहिले खेळाडू ठरला आहे. भारताने नेमबाजीत आतापर्यंत 4 पदके जिंकली आहेत. अवनी लेखराने सुवर्ण, मनीष नरवालने रौप्य, मोना अग्रवाल आणि रुबिना फ्रान्सिसने कांस्यपदकावर नाव कोरले आहे. ॲथलेटिक्समध्येही देशाला 4 पदके मिळाली आहेत. निषाद कुमारने उंच उडीत रौप्य, योगेश कथुनियाने डिस्कस थ्रोमध्ये रौप्यपदक, तर प्रीती पालने महिलांच्या 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले.
नितेश कुमार व्यतिरिक्त जर आपण पुरुष एकेरी स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर भारताला अजून 2 पदके मिळू शकतात. सुहास यथीराजने पुरुष एकेरी SL4 प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे, म्हणजेच त्याचे रौप्य पदक तर निश्चित आहे. या प्रकारात सुकांत कदम कांस्यपदकाच्या लढतीत सहभागी होणार आहे. गेल्या वेळी भारताला बॅडमिंटनमध्ये केवळ एकच पदक जिंकता आले होते. पण पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील पदकांची संख्या 5 च्या वर जाण्याची शक्यत नाकारता येत नाही.
हेही वाचा-
सूर्याची पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी हुकणार?
“जे विराटला नाही जमलं ते हा खेळाडू करणार”, पहिल्यांदाच RCB ला चॅम्पियन बनवणार..!
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डंका! देशाला मिळालं 8वं पदक