---Advertisement---

विराटला येऊदेत, तो तुमची हजेरी घेईल! ‘या’ कारणामुळे पंच नितिन मेनन भारतीय चाहत्यांकडून झाले ट्रोल

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 10:38 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी लढत सोमवारी रोजी (२९ नोव्हेंबर) संपली. धाकधूक वाढवलेल्या या सामन्याचा नाट्यमय अखेर झाला आणि शेवटी हा सामना अनिर्णीत राहिला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणात दमदार प्रदर्शन करणाऱ्या भारताला केवळ एका विकेटमुळे हा सामना जिंकता आला नाही.

पाचव्या दिवसा अंती शेवटच्या डावात २८५ धावांचा बचाव करताना भारतीय संघाने न्यूझीलंडचे ९ फलंदाज बाद केले होते. मैदानावर तग धरून उभारलेले न्यूझीलंडचे खेळाडू रचिन रविंद्र आणि एजाज पटेल यांना बाद करत सामना खिशात घालण्याची भारताकडे सुवर्णसंधी होती. परंतु पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच मैदानी पंचांनी खराब प्रकाशामुळे खेळ थांबवला. परिणामी भारताची विजयाची संधीही हुकली.

यानंतर मैदानी नितीन मेनन यांच्यावर भारतीय चाहते चांगलेच भडकले असून त्यांनी मेनन यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले आहे.

तसे तर, नितीन मेनन यांच्यासह विरेंद्र शर्मा हे सुद्धा या सामन्यात मैदानी पंच म्हणून कार्यरत होते. परंतु भारतीय चाहत्यांनी मेनन यांनाच फैलावर घेतले आहे. यामगचे कारण असे की, पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात त्यातही शेवटच्या षटकात पंच मेनन यांचे लक्ष, सामन्यापेक्षा जास्त व्हिजिबिलीटीवर होते. व्हिजिबिलिटी म्हणजे विशिष्ट प्रकाश किंवा हवामानाच्या स्थितीत एखादी व्यक्ती पाहू शकणारे अंतर अर्थात दृश्यमानता.

https://twitter.com/Vaaran123/status/1465275051679248387?s=20

कानपूरमधील प्रदुषण आणि पडलेले धुके यामुळे सामन्याचे पाचही दिवस कमी प्रकाशाची समस्या उद्धभवली होती. परंतु पाचव्या दिवशी, जेव्हा भारतीय संघ विजयाच्या वाटेवर होता. त्यावेळी भारतीय पंचांकडूनच अशाप्रकारचे वागणे चाहत्यांना खटकले आहे. त्यामुळे भारतीय चाहते सोशल मीडियावर मेनन यांना प्रचंड ट्रोल करत आहेत. त्यांच्यावर भरपूर मीम्सही बनवण्यात येत आहेत.

https://twitter.com/Abhiaj77/status/1465300870845714440?s=20

https://twitter.com/ashutosh_sri8/status/1465278589910196227?s=20

काहींनी तर आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली याची आठवण काढत मेनन यांना ट्रोल केले आहे. ‘विराट भाईला येऊदेत, मग तो तुमची व्हिजिबिलिटी चेक करेल’, अशा शब्दांत चाहत्यांनी मेनन यांना ऐकवले आहे.

यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा व शेवटचा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून सुरू होणार असून ७ डिसेंबर रोजी संपेल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विक्रमी अश्विन! लॅथमची विकेट घेताच ठरला भारताचा तिसरा यशस्वी कसोटी गोलंदाज, हरभजनला पछाडलं

कानपूर कसोटीत अश्विनने मोडला हरभजनचा ‘महाविक्रम’, मातब्बर फिरकीपटूने असे काही करत जिंकली मने

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---