भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा पहिला डाव २०५ धावांवर संपल्यानंतर भारताच्या पहिल्या डावाची सुरुवातही खराब झाली. शुबमन गिल भोपळा ही न फोडता माघारी परतला. तसेच दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रात भारतीय फलंदाज देखील अडचणीत सापडले. दरम्यान सलामीवीर रोहित शर्माच्या विकेटने पुन्हा एकदा अंपायर्स कॉलच्या वादाचा मुद्दा चर्चेत आला.
भारतीय संघातील मुख्य फलंदाज गारद झाल्यानंतर रोहित शर्मा सामना पुढे नेत चांगली फलंदाजी करत होता. अशातच ४९ धावांवर फलंदाजी करत असताना बेन स्टोक्स डावातील ५० व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने रोहितला ऑफ साइडच्या दिशेने टाकलेला चेंडू आत आला आणि रोहितच्या पॅडला जाऊन धडकला.
त्यावर इंग्लंडने जोरदार अपील केल्यानंतर अंपायरने त्याला बाद घोषित केले होते. त्यांनतर रोहितने डीआरएसची मागणी केली असता. त्यात स्पष्टपणे दिसून आले की इम्पॅक्ट अंपायर्स कॉल होता आणि विकेट हिटींग देखील अंपायर्स कॉल होता. त्यामुळे चाहत्यांनी अंपायर्सच्या या निर्णयावरून संताप व्यक्त केला आहे.
तसेच चाहत्यांकडून मैदानातील अंपायर नितीन मेननवर पक्षपात केल्याचा आरोपही केला जात आहे. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असताना देखील मेनन यांनी रोहितला पायचीत बाद घोषित केले होते. त्यावेळी देखील डीआरएस घेतला असता. इम्पॅक्ट अंपायर्स कॉल होता आणि विकेट हिटींग देखील अंपायर्स कॉल होता. त्यांनतर रोहितने संतापात येऊन स्टंपला बॅट मारली होती.
https://twitter.com/urmilpatel30/status/1367745738780913668
https://twitter.com/perfectpull45/status/1367744937958076416
https://twitter.com/urmilpatel30/status/1367745738780913668
Nitin menon has always isssues with rohit sharma it was two umpire call #INDvENG pic.twitter.com/DCdUu8asF1
— RAKSHITH (@Imrakshit45) March 5, 2021
Ro hit miss his half century because of two umpire calls….What a Bad luck #RohitSharma #INDvsENG pic.twitter.com/B4Tlw6ZRxg
— Khushi (@Gaganpreet504) March 5, 2021
2 Umpires Call, SERIOUSLY!!?
Rohit Sharma deserved that Half Century.????UMPIRE BEFORE MATCH START #INDvENG#RohitSharma @BCCI pic.twitter.com/yaoTuWRHTx
— Madhav (@madhaavv) March 5, 2021
Nitin Menon, Rohit Sharma and umpires call. A better love story than twilight.
When once given out in IPL, same umpire and umpires call.
Rohit did this⤵ pic.twitter.com/indgkPBS15— Charuu???? (@Iamcharuu10) March 5, 2021
तसेच चाहत्यांचे म्हणणे आहे की मेनन रोहित शर्मा विरोधात नेहमीच चुकीचे निर्णय देत असतात. अशातच अंपायर्स कॉल बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अबब! कसोटीत सहाशे विकेट घेणाऱ्या दिग्गज अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारणारा पंत पहिलाच, पाहा व्हिडीओ
द्रविडच्या ‘त्या’ क्लबमध्ये सामील झाला रहाणे, सेहवागला पछाडत गेला पुढे
रिटायर झालोय, पण खेळ विसरलो नाहीत! युवराज-सचिन-युसूफची धुव्वाधार फलंदाजी, बघा व्हिडिओ






