पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजी क्रम पूर्णपणे ढेपाळला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया केवळ 150 धावा करून ऑलआऊट झाली. यापैकी 41 धावा आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या नितीश रेड्डीच्या बॅटमधून आल्या, हे विशेष!
नितीश रेड्डीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकमेव वेगवान अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. त्याला मालिकेच्या पहिल्याच सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. आता या युवा खेळाडूनं त्याच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवला आहे. नितीशनं कठीण परिस्थितीत शानदार फलंदाजी केली, ज्यानंतर आता त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
नितीश रेड्डीला विराट कोहलीकडून पदार्पणाची कॅप मिळाली. या सामन्यात कोहली स्वतः काही विशेष करू शकला नाही, पण नितीशनं पदार्पणात दाखवून दिलं की तो कसोटीत भारतासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नितीशनं अत्यंत आक्रमक फलंदाजी करत 59 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं एक जबरदस्त अप्पर कट शॉट खेळला, ज्याची तुलना चक्क क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या शॉटशी केली जात आहे. अशा प्रकारे नितीशनं आपल्या पहिल्या डावातच सर्वांना प्रभावित केलंय.
Sachin Tendulkar vs Brett Lee at WACA, Perth 2008
Nitish Kumar Reddy vs Pat Cummins at Optus, Perth 2024 pic.twitter.com/z62z2vB848
— Johns (@JohnyBravo183) November 22, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 150 धावा करून ऑलआऊट झाला. भारतासाठी नितीश कुमार रेड्डीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. रिषभ पंत आणि केएल राहुल यांनी अनुक्रमे 37 आणि 26 धावांचं योगदान दिलं. भारताचे इतर फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
हेही वाचा –
IPL; बीसीसीआयचा नवा नियम येताच विदेशी खेळाडूंचा सूर बदलला, पुढील तीन हंगामांसाठी मोठा निर्णय!
800 बळी घेणाऱ्या महान खेळाडूचं निधन, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
IND VS AUS; कांगारुंचा दबदबा, पहिल्या डावात टीम इंडिया 150 धावांत गारद!