भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांंच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांच्या पुढे 9 विकेट गमावून 358 धावा केल्या. ज्यात नितीश रेड्डी आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावल्यानंतर नाबाद असून क्रिझवर 105 धावा करून त्याला मोहम्मद सिराज साथ देत आहे. रेड्डीच्या शतकाच्या जोरावरच भारताला फॉलोऑन पुढे ढकलून ही धावसंख्या गाठता आली. या अष्टपैलू खेळाडूने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्येही आपल्या बॅटने अप्रतिम कामगिरी दाखवली, पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही, पण त्याने हे काम मेलबर्नमध्ये पार पाडले.
एमसीजी कसोटीदरम्यान नितीश कुमार रेड्डीची फिल्मी शैलीही पाहायला मिळाली. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने पुष्पा स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले, तर त्याने बाहुबली स्टाईलमध्ये शतक साजरे केले. त्याचा हा चित्रपटातील लूक चाहत्यांना आवडला आहे.
पाहा व्हिडिओ-
Nitish Kumar Reddy hits his maiden Test century and receives a standing ovation from the MCG crowd ❤️ #AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/Vbqq5C26gz
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2024
नितीश रेड्डीने आतापर्यंत आपल्या 05 धावांच्या खेळीत 10 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार मारला आहे.
तिसऱ्या दिवशी 191 धावांवर भारताने रिषभ पंतची विकेट गमावली तेव्हा नितीश रेड्डी फलंदाजीला आला. त्यावेळी फॉलोऑनही सेव्ह करणं अवघड वाटत होतं. यानंतर भारताने 221 धावांवर रवींद्र जडेजाच्या रूपाने 7वी विकेट गमावली. त्यानंतर नितीश रेड्डीला वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळाली आणि दोघांनी 8व्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने 8व्या विकेटसाठी केलेली ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग यांच्या नावावर आहे ज्यांनी 2008 मध्ये 8व्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली होती. हा विक्रम मोडण्यास रेड्डी-सुंदर अवघ्या तीन धावांनी हुकले.
हेही वाचा-
नितीश रेड्डीचं शतक, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी; मेलबर्नमध्ये तिसरा दिवस भारताच्या नावे
नितीश रेड्डीच्या शानदार शतकानंतर माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, “त्याचे हे शतक भारतीय…”
IND vs AUS; सामना एक विक्रम अनेक, 21 वर्षीय नितीशकुमारने मेलबर्न गाजवले..!