बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये नितीश कुमार रेड्डीने इतिहास रचला आहे. नितीश कुमार रेड्डी हा या मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. तर ऑस्ट्रेलियात त्याने कसोटी मालिकेत पाहुण्या फलंदाजाने संयुक्तपणे सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. रेड्डीने या मालिकेत आतापर्यंत 8 षटकार मारले आहेत. रेड्डीपूर्वी मायकल वॉनने 2002-03 ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियात खेळताना 8 षटकार ठोकले होते. ख्रिस गेल 2009-2010 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत 8 षटकार मारण्यात यशस्वी ठरला होता.
म्हणजेच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत 8 षटकार मारणारा रेड्डी पहिला भारतीय ठरला आहे. आता एक षटकार मारल्यानंतर रेड्डी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम करेल. या मालिकेत नितीश कुमार रेड्डीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रेड्डीने 41, 38*, 42, 42, 16 आणि आता नाबाद 85 धावांच्या खेळी खेळल्या आहेत. रेड्डीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले आहे.
या मालिकेतील चाैथ्या सामन्यात भारतीय संघ संकटात सापडला होता. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. नितीश कुमार रेड्डीने आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा कसा सामना केला जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे. रेड्डीने या मालिकेत 200 हून अधिक धावा केल्या आहेत. रेड्डीने एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे.
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 474 धावा केल्या. ज्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 140 धावांची शानदार खेळी केली. तर लॅबुशेनने 72 धावा केल्या. याशिवाय सॅम कॉन्स्टन्सने 60 धावा करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 474 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर भारतीय दिग्गज फलंदाज पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. मात्र यानंतर नवोदित खेळाडूंनी भारतीय संघाला सावरले. ज्यात यशस्वी जयस्वाल, नितीशकुमार रेड्डी आणि वाँश्गिंटन सुंदर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा-
नितीश रेड्डी आणि अंपायरने डोक्यावर कोणता स्प्रे मारला? नक्की काय होतं कारण?
नितीशकुमार रेड्डीचे ‘पुष्पा’ सेलीब्रेशन, अर्धशतक ठोकताच दाखवला ‘फायर’ अंदाज, पाहा VIDEO
IND vs AUS: ‘मूर्खपणाची हद्द…’, रिषभ पंतच्या शाॅट सिलेक्शनवर सुनील गावस्कर संतापले