भारताचा युवा फलंदाज ‘नितीश कुमार रेड्डी’ने (Nitish Kumar Reddy) ऑस्ट्रेलियात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावून या सामन्यात भारतासाठी शानदार पुनरागमन केले आहे. नितीशने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. त्यामुळे त्याच्या खेळीचे खूप कौतुक होत आहे. दरम्यान क्रिकेट जगतातील दिग्गजांनी देखील त्याच्या खेळीचे खूप कौतुक केले आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) 105 धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 474 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने 9 गडी बाद 358 धावा केल्या. भारतीय संघ अजून 116 धावांनी पिछाडीवर आहे. एकवेळ भारतीय संघाने 221 धावांवर 7 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर (162 चेंडूत 50 धावा) यांच्या शानदार शतकी भागीदारीने भारताचे पुनरागमन केले.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात युवा खेळाडू ‘नितीश कुमार रेड्डी’ने (Nitish Kumar Reddy) शानदार शतक झळकावले. या बाॅक्सिंग डे कसोटीत त्याने 140 कोटी भारतीयांंची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. नितीशने अर्धशतक झळकावल्यानंतर पुष्पासारखे सेलीब्रेशन केले, तर ज्यावेळी त्याने शतक शतक झळकावले तेव्हा बाहुबलीसारखे आयकाॅनिक सेलीब्रेशन केले. नितीशने केलेल्या सेलीब्रेशनला चाहते सोशल मीडियावर खूप पसंत करत आहेत.
This hundred, this iconic moment, this courageous talent of #IndianCricket will be remembered for ages! What an innings! I am getting very emotional. I know the entire nation too are in same mode. What a player! Take a bow #NitishKumarReddy! You are a champion in the making…… pic.twitter.com/eWrbFwXFid
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) December 28, 2024
On public demand This is for Nitish Kumar reddy. Well played youngster 👏 so proud of you 💯 pic.twitter.com/F6e4T9XEkJ
— Irfan Pathan (@IrfanPathan) December 28, 2024
Amazing show from #NitishKumarReddy, coming in at No. 8 and then scoring a century, forming a brilliant partnership with Washington Sundar in his debut test series!! So proud ❤️❤️#INDvsAUS pic.twitter.com/DHAe7VHk26
— Venkatesh Daggubati (@VenkyMama) December 28, 2024
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये मध्ये नितीश कुमार रेड्डीची कामगिरी
पर्थ कसोटी- 41 आणि नाबाद 38
ॲडलेड कसोटी- 42 आणि 42 धावा
ब्रिस्बेन कसोटी- 16 धावा
मेलबर्न कसोटी- नाबाद 105
महत्त्वाच्या बातम्या-
नितीश रेड्डीचं शतक, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी; मेलबर्नमध्ये तिसरा दिवस भारताच्या नावे
नितीश रेड्डीच्या शानदार शतकानंतर माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, “त्याचे हे शतक भारतीय…”
IND vs AUS; सामना एक विक्रम अनेक, 21 वर्षीय नितीशकुमारने मेलबर्न गाजवले..!