---Advertisement---

अखेर केकेआरचा नवा कर्णधार घोषित! श्रेयसच्या अनुपस्थितीत ‘या’ वादळी फलंदाजाकडे धुरा

Kolkata-Knight-Riders-KKR
---Advertisement---

आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे त्रस्त असल्याने या हंगामात खेळू शकणार त्याच्या जागी नितिश राणा संघाचे नेतृत्व करेल. केकेआर संघ व्यवस्थापनाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली.

मागील हंगामात संघाचे नेतृत्व करत असलेल्या श्रेयस अय्यर याला नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दुखापत झाली. पाठदुखीमुळे श्रेयस संपूर्ण हंगामात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या हंगामात नेतृत्व कोण करणार असा प्रश्न अनेक दिवसांपासून विचारला जात होता. अखेर सोमवारी या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला.‌

https://www.instagram.com/p/CqSolW2ykWE/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

केकेआरने एक निवेदन जाहीर करत, राणा या हंगामात संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. श्रेयस जोपर्यंत उपलब्ध नाही तोपर्यंत राणाच संघाची जबाबदारी सांभाळेल असे सांगण्यात आले. मागील सहा वर्षांपासून राणा केकेआर संघाचा भाग आहे.

केकेआरचा पुढील कर्णधार कोण? याबाबतची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. सुनील नरीन, शार्दुल ठाकूर व आंद्रे रसेल व राणा यांच्यापैकी एक जण संघाचा कर्णधार असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ही जबाबदारी राणाकडे दिली गेली.

नितिश राणा याच्याकडे आयपीएल खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. दिल्लीसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या राणा याने आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी केली होती. दोन हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खेळल्यानंतर 2018 पासून तो केकेआरचा सदस्य आहे. त्याने यादरम्यान 91 सामने खेळताना 2181 धावा केल्या आहेत.

(Nitish Rana Appointed As New KKR Captain In Place Of Injured Shreyas Iyer)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या विजयाला वादाची काळी किनार! शफालीला बाद देण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू 
नॅट सिव्हरची पैसा वसूल कामगिरी! 3.20 कोटींच्याच दर्जाचा खेळ दाखवत बनवले मुंबईला चॅम्पियन 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---