---Advertisement---

‘कोच’ राहुल द्रविडकडून श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या नितीश राणा आणि चेतन साकारियाला शिकायचेत ‘हे’ दोन गुण

On: शनिवार, जुलै 17, 2021 12:48 AM
---Advertisement---

भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला यजमानांविरुद्ध ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच भारताचे नियमित प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री भारतीय कसोटी संघासह इंग्लंडला गेले असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविडकडे भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना द्रविडचे मार्गदर्शन मिळणार आहे.

याबद्दल नितीश राणा आणि चेतन सकारिया या खेळाडूंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की राणाने म्हटले आहे की त्याला द्रविडमधील धैर्य शिकायचे आहे, तर साकारियाने म्हटले आहे की त्याला द्रविडमधील दृढनिश्चयाचा गुण शिकण्याची इच्छा आहे. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याती संधी असणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये नितीश राणा हा कोलकाता नाइट राइडर्स संघाकडून प्रतिनिधित्व करतो. त्याने आत्तापर्यंत आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या संघात संधी मिळाली आहे. तो द्रविडबद्दल बोलताना म्हणाला, “मी ऐकले आहे की प्रशिक्षक राहुल द्रविड हे खेळाडू राहुल द्रविड सारखेच आहेत. त्याच्याकडे असलेल्या धैर्याचा मी 1 टक्काही गाठू शकलो, तरीही माझासाठी ती खूप मोठी गोष्ट असेल.”

डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियासाठी मागील काही महिने जवळजवळ स्वप्नासारखेच होते. चेतन सकारियाला देखील प्रशिक्षक राहुल द्रविडकडून एक गोष्ट शिकून घ्यायची आहे. चेतनने सांगितले की, त्याला द्रविडकडून दृढनिश्चय हा त्याचा गुण शिकून घ्यायचा आहे.

चेतन पुढे म्हणाला की, “मला जाणून घ्यायचे आहे की त्यांनी दृढनिश्चयाने एवढ्या सगळ्या गोष्टी कशा साध्य केल्या आहेत. मला त्यांचा हा गुण समजून आणि शिकून घ्यायचा आहे, जे त्याला एक उत्कृष्ट खेळाडू आणि दृढ बनवते.”

या डावखुऱ्या गोलंदाजाने आयपीएलसह देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप सोडली आहे. तो एकेकाळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा नेटमध्ये गोलंदाज होता. राजस्थान रॉयल्सने या हंगामात त्याला 1.2 कोटी रुपयांत विकत घेतले होते.

भारत आणि श्रीलंका संघात 18 जुलैपासून एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय क्रिकेटचे जय-विरू!! रैनाने उलगडले धोनीबरोबरचे खास मैत्रीचे किस्से

जेव्हा केवळ १० वर्षांचा खेळाडू झाला होता ऑलिम्पिकमध्ये सामील, आजही त्याच्याच नावावर आहे ‘हा’ विक्रम 

अबब! १०० कोटींच्या क्लबमध्ये ‘या’ ५ धुरंधरांचा समावेश; जाणून घ्या कुणाची आहे किती कमाई?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---