कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल २०२०चा २४वा सामना झाला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या. दरम्यान अतिशय मजेशीर घटना घडली. कोलकाता संघाचा फलंदाज नितिश राणा स्वत:च्या चुकीमुळे केवळ २ धावांवर धावबाद झाला.
झाले असे की, कोलकाता संघाचे फलंदाज राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर आले. मात्र त्रिपाठी २.४ षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर त्रिपळाचीत झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नितिश राणा आला. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने डावातील चौथे षटक टाकण्यासाठी युवा गोलंदाज अर्शदिप सिंगला पाठवले.
अर्शदिपने षटकातील तिसरा चेंडू टाकला. स्ट्राईकवर असलेल्या फलंदाज गिलने तो चेंडू शॉर्ट फाइन लेगकडे मारला. त्यामुळे नॉन स्ट्राईकर बाजूला असलेला राणा एक धाव घेण्यासाठी पळाला. मात्र गिल चेंडू जास्त दूर न गेलेला पाहून धावण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता. पण राणाला धाव घेऊ नको हे सांगेपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण राणाने गिलकडे धाव घेतली होती आणि पाहता-पाहता हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या एकाच बाजूकडे होते.
तेवढ्यात शमीने चेंडू पकडून थेट यष्टीवर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा चेंडू मिस झाला. पण समोर उभा असलेल्या निकोलस पूरनने चेंडू पकडला आणि त्याने नॉन स्ट्राईकर बाजूला जात यष्टीवर चेंडू मारला. त्यामुळे राणा धावबाद झाला.
https://twitter.com/Cric_life59/status/1314874770182168577
#KXIPvKKR #KKRHaiTaiyaar #Dream11IPL pic.twitter.com/sF1GnMnnhv
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 10, 2020
#BestHomeCommentator @Housing#KKR #KXIP
Gill : Rana bro Go back bro..Rana : You called me chotu you go…
Gill : Le bhai.. I put bat in crease.. You go back now.. pic.twitter.com/TEEObi9vwL
— SHAIK RAHEEM YOUNUS (@thejanuaryboy) October 10, 2020
Gill to Rana
Mujhko Rana ji maaf karna Galti mhare se ho gayi #KKRvKXIP pic.twitter.com/Y54Wu81LB6— S Ravind King (@sravindking) October 10, 2020
Rana and Gill😂 pic.twitter.com/1VwCZDsScc
— Prab❤️ssVIRAT (@pbwarrior143) October 10, 2020
https://twitter.com/likhithaSuggala/status/1314874654876598272?s=20
अशीच घटना यापुर्वीही बऱ्याचदा घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तानचे फलंदाज बऱ्याचदा अशाप्रकारे धावबाद झाले आहेत. यावर्षी १९ वर्षांखालील विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध भारत संघातील सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार रोहेल नजीर आणि कासिम अकरम यांनी अशीच चूक केली होती. त्यांच्या या चूकीमुळे अकरम धावबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
जावईबापू जोमात..! आशिया खंडात कोणालाही न करता आलेला विक्रम शोएब मलिकच्या नावावर
कट्टर प्रतिस्पर्धी असलेले ‘हे’ खेळाडू गाजवतायत मैदान; म्हणे, एकमेकांसोबत खेळताना वाटतो आनंद
IPL 2020: चेन्नई विरुद्ध बेंगलोर सामन्यात धोनी, कोहलीसह ‘हे’ खेळाडू करु शकतात खास विक्रम
ट्रेंडिंग लेख-
जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई
शेन वॉर्नच्या ‘त्या’ चेंडूला रिची बेनो यांनीच म्हटले होते शतकातील सर्वोत्तम चेंडू
आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित