क्रिकेटजगतात अनेक असे खेळाडू आहेत, जे शतक केल्यावर किंवा विकेट घेतल्यावर आगळे वेगळे सेलिब्रेशन करताना दिसतात. रविवारी (१० एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात देखील असेच काही पाहायला मिळाले. कोलकाता संघाचा फलंदाज नितीश राणाने अर्धशतक झळकावल्यानंतर ‘थ्री फिंगर हॅन्ड जेस्चर’ सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. या सेलिब्रेशननंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. आता स्वत: राणानेच या सेलिब्रेशनबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
या सामन्यात नाणेफेकीचा कौल हैदराबाद संघाच्या दिशेने लागला होता. त्यांनी कोलकाता संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर सलामीला आलेल्या शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी सुरुवातीपासूनच हैदराबाद संघाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. राणाने या सामन्यात ५६ चेंडूत ८० धावांची खेळी केली होती. यात त्याने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले होते.
अर्धशतक झळकावल्यानंतर राणाकडून आगळे वेगळे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने डगआऊटच्या दिशेने पाहून बॅट दाखवत थ्री-फिंगर हॅन्ड जेस्चर केल्याचे पाहायला मिळाले होते.
सामना झाल्यानंतर त्याने हरभजन सिंगला दिलेल्या मुलाखतीत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला की, “हे सेलिब्रेशन माझ्या मित्रांसाठी होते. आमचा मित्रांचा मोठा ग्रुप आहे. आम्हाला ‘ब्राऊन मुंडे’ हे गाणं खूप आवडतं.” तसेच त्याने हरभजन सिंग सोबत मिळून हे गाणेदेखील गायले.
Talk about being on song 🎶🎶@28anand gets @harbhajan_singh & @NitishRana_27 rapping post @KKRiders' win over #SRH. 😎😎 #VIVOIPL #SRHvKKR @Vivo_India
Watch the full interview 🎥👇https://t.co/9hAW2yvm0H pic.twitter.com/DlL6osKbfY
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2021
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८७ धावा केल्या होत्या. त्यानंतर १८८ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही.हैदराबाद संघाकडून जॉनी बेअरस्टोने ५५ आणि मनीश पांडेने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. परंतु हैदराबाद संघाला हा सामना जिंकण्यात यश आले नाही. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १० धावांनी आपल्या नावावर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नितीश राणाचा नवा पॅटर्न! अर्धशतक झळकावताच केले आगळेवेगळे सेलिब्रेशन, सोशल मीडियावर एकच चर्चा
“तो सूर्यकुमार यादवचा प्रो व्हर्जन आहे, त्याला सलामीला संधी मिळावी”