दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील टी-२० मालिका पुढच्या महिन्यात खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने रविवारी (२२ मे) भारतीय संघाची घोषणा केली. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांना या मालिकेसाठी पहिल्यांदा भारतीय संघात निवडले गेले. परंतु असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएल २०२२ मध्ये उत्कृष्ट प्रदर्श करून देखील त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. नितीश राणाला देखील संघातून वगळले गेले आहे, ज्यानंतर त्याचे एक खास ट्वीट चर्चेत आले आहे.
आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा धमाकेदार फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) चालू हंगामात चांगलाच चमकला. पण तरीही त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडले गेले नाही. भारतीय संघात निवड न झाल्यामुळे नितीश चांगलाच निराश झाला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची ही निराशा व्यक्त केली. अधिकृत ट्वीटर खात्यावरून त्याने केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, “लवकरच परिस्थिती बदलेल.” नितीशच्या या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजन त्याला धीर देण्याचे कामही करताना दिसत आहेत.
Things will change soon 🇮🇳🧿
— Nitish Rana (@NitishRana_27) May 22, 2022
दरम्यान चालू हंगामात नितीशचा संघ केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, पण त्याने वैयक्तिक प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. त्याने हंगामातील १४ सामन्यांमध्ये १४४ च्या स्ट्राईक रेटने आणि २७.७७ च्या सरासरीने ३६१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधील एकंदरीत कामगिरी पाहिली तर, त्याने ९१ सामन्यात २८ च्या सरारसीने २१८१ धावा केल्या आहेत.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत रोहित शर्मा अनुपस्थित असणार आहे. अशात केएल राहुलवर कर्णधारपदाची जबाबदारी असेल. रोहित, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी दरम्यानच्या काळात विश्रांती दिली गेली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक मोठ्या काळातनंतर संघात पुनरागमन करत आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२चा टेबल टॉपर गुजरात ठरणार विजेता? असं आम्ही नाही हे आकडे सांगतायत
अगग! एका क्रिकेटरनेच लावला रिषभ पंतला कोटींचा चुना, वाचा संपूर्ण प्रकरण
वातावरणाने अडथळा आणल्यास कसे लागणार प्लेऑफ सामन्यांचे निकाल? वाचा आयपीएलचे नवे नियम