भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी(18 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता केली आहे. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने सलग तीन अर्धशतके करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्यामुळे त्याचे सर्वांनीच कौतुक केले आहे. धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत चौथ्या क्रमांकावर येऊन नाबाद 87 धावांची खेळी केली होती. तर त्याआधी तो पहिल्या आणि दुसऱ्या वनडेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.
त्यामुळे त्याच्यासाठी कोणता क्रमांक योग्य आहे याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होत आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने धोनीसाठी पाचवा क्रमांक योग्य असल्याचे म्हटले आहे.
याबद्दल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेनंतर विराट म्हणाला, ‘एमएस धोनीने 2016मध्ये काही वेळासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यानंतर त्याने संघासाठी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास प्राधान्य दिले.’
‘मला वैयक्तीक दृष्टीने त्याच्यासाठी पाचवा क्रमांक योग्य वाटतो. कारण या क्रमांकावर तो खेळायला आला तर त्याला काही वेळही मिळेल आणि तो सामन्याच्या शेवटपर्यंत खेळूही शकतो तसेच गरज असेल तेव्हा आक्रमक खेळूही शकतो.’
‘त्यामुळे मला आणि संघ व्यवस्थापनाला वाटते की पाचवा क्रमांक त्याच्यासाठी योग्य क्रमांक आहे. त्याने ऍडलेडमध्ये (दुसरी वनडे) ज्याप्रकारे फलंदाजी केली, तो त्या क्रमांकावर खूप चांगला खेळला. त्यानंतर त्याने तिसऱ्या वनडेतही चौथ्या क्रमांकावर चांगला खेळ केला. फलंदाजीचा क्रमांक हा संघाच्या समतोलवर अवलंबून असतो. त्यामुळे अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.’
या बरोबरच विराट असेही म्हणाला की ‘भारतीय क्रिकेटसाठी धोनी इतके कोणी वचनबद्ध नाही.’
तसेच पुढे विराट म्हणाला, ‘धोनीसाठी भारतीय संघ खूश आहे. तो आता लयीत आला आहे. कारण लयीत येण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी तूमच्या धावा होणे महत्त्वाचे असते. विशेषत: जेव्हा तूम्ही खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसता तेव्हा.’
‘बाहेर अनेक गोष्टी होत असतात. लोक अनेक गोष्टींविषयी चर्चा करतात पण अस व्यक्ती म्हणून आम्हाला माहित आहे की त्याच्याइतके कोणीही वचनबद्ध नाही. लोकांनी त्याला त्याचा वेळ द्यायला हवा. कारण त्याने देशासाठी खूप योगदान दिले आहे.’
‘त्यांनी त्याला काय गरजेचे आहे हे त्याचे त्यालाच ठरवू द्यावे. तो एक हुशार क्रिकेटपटू आहे आणि त्याला माहित आहे त्याच्यासाठी काय आवश्यक आहे. आम्ही संघ म्हणून त्याच्यासाठी खूप आनंदी आहोत.’
https://twitter.com/BCCI/status/1086237193494921216
महत्त्वाच्या बातम्या-
–म्हणून रॉजर फेडरर जगातील सर्वोत्तम खेळाडूच नाही तर व्यक्ती देखील आहे






