---Advertisement---

टीम इंडियाच्या तारणहाराचा भाऊ IPL मध्ये Unsold, बेस प्राईजलाही कुणीच घेतलं नाही संघात

IPL-2024-Auction
---Advertisement---

IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 साठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईच्या कोका कोला एरेनामध्ये पार पडला. या लिलावात एकूण 333 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले होते. त्यात 214 भारतीय आणि 119 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. मात्र, यातील 77 खेळाडूच विकले जाणार होते, पण काही संघांकडील पुरेसे पैसे नसल्यामुळे फक्त 72 खेळाडूच विकले गेले. तसेच, अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. या अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा भाऊ मोहम्मद कैफ याच्या नावाचाही समावेश होता.

मोहम्मद शमी याचा भाऊ मोहम्मद कैफ (Mohammed Shami’s Brother Mohammed Kaif Unsold) हा आयपीएल 2024 लिलावात अनसोल्ड राहिला. 20 लाखांची बेस प्राईज असणाऱ्या कैफवर कोणत्याही संघाने बोली लावण्यात रस दाखवला नाही. शमीचा लहान भाऊ असूनही 27 वर्षीय खेळाडूला कुणीही आपल्या संघाचा भाग बनवले नाही.

खरं तर, मोहम्मद कैफ (Mohammed Kaif) आपल्या भावाप्रमाणेच वेगवान गोलंदाज आहे. तो बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने अलीकडेच बंगालसाठी अ दर्जाच्या 9 सामन्यात शानदार प्रदर्शन केले होते. त्याने 2021मध्ये बंगाल क्रिकेट संघासाठी अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, जेव्हा त्याच्या भावाची चर्चा होते, तेव्हा मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा भारताचा आणि आयपीएलमधीलही स्टार गोलंदाज आहे.

https://twitter.com/IPL/status/1737119808465125526

शमीची आयपीएल कामगिरी
दुसरीकडे, मोहम्मद शमी याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो आयपीएल 2023 हंगामातील पर्पल कॅप विजेता गोलंदाज राहिला आहे. तो मागील दोन हंगामापासून गुजरात टायटन्स संघाचा स्टार गोलंदाज राहिला आहे. तो आयपीएल 2022चा किताब जिंकणाऱ्या गुजरात संघाचा भाग होता. तसेच, 2023मध्ये शमी आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला होता. मात्र, तिथे त्यांना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

शमी वनडे विश्वचषकाचा हिरो
याव्यतिरिक्त शमीची अलीकडची कामगिरी पाहिली, तर कुणीही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. त्याला पहिल्या 4 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, त्याला जशी संधी मिळाली, तसं त्याने त्या संधीचं सोनं करून दाखवलं. त्याने पुढील 7 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या होत्या. अशाप्रकारे तो वनडे विश्वचषक 2023 हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही बनला होता.

शमीविषयी बोलायचं झालं, तर तो सध्या घोट्याच्या दुखापतीतून सावरत आहे. या दुखापतीमुळेच त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळता आले नाही. दुसरीकडे, तो कसोटी मालिकेतूनही बाहेर पडला आहे.

हेही वाचा-
टेन्शन नाही! मुंबई इंडियन्सला मिळाला नवा मलिंगा, विरोधी टीमसाठी धोक्याची घंटी; पाहा व्हायरल Video
इतिहास घडला! बांगलादेशी पठ्ठ्याने केली सचिनचा 14 वर्षे जुना Record मोडण्याची डेरिंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---