भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघासाठी खेळत आलेल्या साहाने सोमवारी (२३ मे) ईडन गार्डन त्याच्या होम ग्राउंड नसल्याचे सांगितले. साहाच्या मते गुजरातचे मोटेरा स्टेडियम आता त्याचे होम ग्राउंड आहे.
बंगाल क्रिकेट संघाच्या (सीएबी) अधिकाऱ्यांसोबत मतभेद झल्यानंतर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व न करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएबीच्या एका अधिकाऱ्याने राज्याच्या संघासाठी साहाच्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर साहाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, २००७ मध्ये साहाने त्याच्या रणजी पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली होती आणि तेव्हापासून त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाची सुरुवात झाला.
साहाचा संघ गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मगंळवारी (२४ मे) आयपीएल २०२२ चा पहिला क्वॉलिफायर सामना खेळला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी एका ऑनलाईन चर्चेमध्ये साहाने खास प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मी याठिकाणी गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करत आहे, त्यामुळे माझे होम ग्राउंड मोटेरा आहे. मी आता केकेआरसोबत नाहीये, अशात ईडन गार्डन माझे होम ग्राउंड नाहीये.”
दरम्यान, साहाची अनुमती नसताना आता रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी झारखंडविरुद्ध त्याला बंगाल संघात सहभागी केले गेले आहे. साहाने रणजी स्पर्धेच्या चालू हंगामात साखळी फेरीमध्ये सहभाग घेतला नव्हता. सीएबीचे सहायक सचिव देवव्रत दास यांनी साहा साखळी फेरीत खेळला नसल्यामुळे त्याच्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केला होता आणि याच कारणास्तव साहा नाराज झाला होता. साहाची ही नाराजी अद्याप दूर झाल्याचे दिसत नाहीये
साहाच्या मते राज्याच्या क्रिकेट संघाने कठीण काळात त्याची साथ दिली नाही. साहाने बंगाल संघाची साथ सोडण्यासाठी सीएबीकडे तोंडी स्वरूपात एनओसी मागीतली आहे. आयपीएल २०२२ मध्ये साहा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने हंगामात तीन अर्धशतकांच्या जोरावर ३१२ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियात निवड न झाल्याने नितीश राणाने व्यक्त केले दु:ख, ट्वीट करत केले मोठे विधान
अगग! एका क्रिकेटरनेच लावला रिषभ पंतला कोटींचा चुना, वाचा संपूर्ण प्रकरण
बाबो! गुजरात-राजस्थान सामन्यापूर्वी कोलकात्यात वादळाचा तांडव, ईडन गार्डन स्टेडियमचेही नुकसान