जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम (आयपीएल) कोरोना व्हायरसमुळे स्थगित केला गेला आहे. विविध संघांतील खेळाडू आणि कर्मचारी यांचे कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने २९ सामन्यांनंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आता स्पर्धेतील उर्वरित सामने कुठे खेळवले जाणार याविषयी चाचपणी सुरू आहे. मात्र, आता पुढे होणाऱ्या सामन्यांमध्ये इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आयपीएल केली आहे स्थगित
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन भारतातील विविध शहरांमध्ये केले जात होते. मात्र, स्पर्धा निम्मी पार पडल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचे वरूण चक्रवर्ती व संदीप वॉरियर हे खेळाडू कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामना स्थगित करण्यात आला होता. पुढे इतर संघातील खेळाडू आणि कर्मचारी देखील कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली गेली.
या कारणाने इंग्लंडचे खेळाडू होणार नाही सामील
आयपीएलचा शिल्लक राहिलेला हंगाम या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये खेळला जाऊ शकतो. या काळात ही स्पर्धा खेळली केल्यास इंग्लंडचे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने असल्याने आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. आयपीएलमध्ये इंग्लंडचे सर्व अव्वल क्रिकेटपटू खेळत असतात. यामध्ये कर्णधार ओएन मॉर्गन, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, लियाम लिव्हींगस्टोन, जेसन रॉय, मोईन अली, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, टॉम करन व सॅम करन यांचा समावेश आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे संचालक ऍशले जाईल्स यांनी याबाबत संकेत दिले होते.
आयपीएल पूर्णपणे रद्द झाल्यास बीसीसीआयला २५०० कोटींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आयपीएलचे उर्वरित ३१ सामने कोणत्याही परिस्थितीत खेळणे बीसीसीआयची प्राथमिकता आहे. यासाठी श्रीलंका, युएई व इंग्लंड असे पर्याय समोर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये अशा प्रकारची बॅट वापरण्यास एमसीसीने दिला नकार
श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयची खास योजना, शास्त्री नव्हे तर हा दिग्गज असणार संघ प्रशिक्षक?