---Advertisement---

“फिरकी गोलंदाजांना मदत मिळावी अशी खेळपट्टी बनवण्यासाठी….” कानपूर कसोटीपूर्वी पीच क्युरेटरचा मोठा खुलासा

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 8:52 AM
Team India
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. ही राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो.

तसेच टी२० मालिकेत पराभूत झालेला न्यूझीलंड संघ देखील जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी ग्रीन पार्क स्टेडियमच्या पीच क्युरेटरने एक मोठा खुलासा केला आहे.

गेल्या २ दशकांपासून ग्रीन पार्क स्टेडियमवर पीच क्युरेटर म्हणून कार्यरत असलेल्या शिव कुमार यांनी म्हटले की, “आम्हाला बीसीसीआयकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही किंवा फिरकी गोलंदाजांना मदत मिळावी अशी खेळपट्टी बनवण्यासाठी संघ व्यवस्थापनाने माझ्याशी संपर्क केला नाही. आम्ही चांगली खेळपट्टी तयार केली आहे. मी खात्री देतो की, ही खेळपट्टी लवकर तुटणार नाही.”

भारत विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ जेव्हा २०१६ मध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी तो सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला होता. परंतु, गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला, तर फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर परदेशी संघ ३ दिवससुद्धा टिकू शकले नाहीये. याबाबत बोलताना शिव कुमार म्हणाले की, “यासाठी फक्त खेळपट्टीला जबाबदार ठरवणे योग्य नाहीये. टी२० क्रिकेटमुळे, फलंदाज ज्या पद्धतीने फिरकी गोलंदाजांना खेळतात ते देखील एक महत्वाचे कारण आहे.

मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडणार आहे, तर दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबर रोजी मुंबईच्या वानखेडेवर स्टेडियमवर पार पडणार आहे. तसेच भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. तो मुंबईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या हाती संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हरभजन सिंगने विकला आपला मुंबईतील लक्झरी अपार्टमेंट, जाणून घ्या किती किंमतीत झाला सौदा?

न्यूझीलंडला आव्हान देण्यासाठी रहाणे अँड कंपनी सज्ज!! नेट्समध्ये द्रविडने करुन घेतली जबरदस्त तयारी

वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---