भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला नेहमीच निवडकरत्यांकडून डावलण्यात आल्याचे आपण पाहिले आहे. याच पार्श्वभूमीवर त्याला आयर्लंड क्रिकेट बोर्डकडून खेळण्यासाठी प्रस्ताव दिला गेल्याचे सांगितले जात होते. तसेच, या प्रस्तावाला संजूने नकार दिलाचे देखील वृत्त अनेक वृत्तवाहिनी व वृत्तसंस्थांनी दिलेले. मात्र, आता आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून असा प्रस्तावच दिला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संजू सॅमसन हा नेहमी भारतीय संघाच्या जवळपास असतो. चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याला सातत्याने संधी मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर त्याला आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव आल्याचे वृत्तसमोर आलेले. त्याला आयर्लंड संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळणार असे सांगितले गेलेले. मात्र, संजू ने या प्रस्तावाला नकार दिल्याचे दुसरे वृत्त पुढे आलेले. या संपूर्ण प्रकरणाची दोन दिवसात चांगली चर्चा झालेली. आता याच गोष्टीबाबत एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे.
आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार,
‘संजू सॅमसन याला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आयर्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेला नाही. याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. कृपया अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये.’
संजू सॅमसन यावर्षी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याच्याच नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर संजूने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी भरीव कामगिरी केली. मात्र, तरीदेखील बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची निवड झाली नाही. त्यामुळे संजूवर वारंवार अन्याय होत असल्याची भावना चाहत्यांमध्ये निर्माण झालेली. तसेच, जून महिन्यात झालेल्या आयर्लंड दौऱ्यावेळी त्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आयर्लंडमध्ये मिळाला होता.
(No Offer To Sanju Samson Ireland Cricket Board Clarify)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा कर्णधारही पडला ‘बॅझबॉल’च्या प्रेमात! म्हणाला, “हेच क्रिकेट पाहायला आवडतं”
स्टोक्सला आपला युवा फलंदाज वाटतोय दुसरा विराट; पाकिस्तानला चोप-चोप चोपलंय