---Advertisement---

नको रोहित नको! कर्णधाराच्या ‘या’ निर्णयावर चाहते नाराज, स्टॅन्डमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

On: सोमवार, फेब्रुवारी 19, 2024 3:58 PM
Sarfaraz Khan Rohit Sharma
---Advertisement---

राजकोट कसोटी सामन्यात भारताने तब्बल 434 धावांच्या अंतराने विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारताचा कर्धणार रोहित शर्मा याने 4 बाद 430 धावांवर डाव घोषित केला. शेवटच्या डावात इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण रविंद्र जडेजा याच्या फिरकीत अडकून संपूर्ण इंग्लंड संघ 122 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाचा विजय मोठा असला, तरी कर्णधार रोहितने डाव घोषित करून त्याला मर्यादा आणली, असे अनेकांना वाटते. याच पार्श्वभूमीवर रोहितचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लंड क्रिकेट संघ 557 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आल्यानंतर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या फिरकी गोलंदाजीने कमाल केली. जडेजाने शेवटच्या डावात 12.4 षटकात 41 धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव याला या डावात 2 विकेट्स मिळाल्या. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. दुसरीकडे मार्क वुड (Mark Wood) सोडला, तर एकही इंग्लिश फलंदाज शेवटच्या डावात 20 धावा करू शकला नाही. तत्पूर्वी भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने द्विशतक केले. त्याने 236 चेंडूत त्याने 14 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 214 धावांपर्यंत मजल मारली. शुबमन गिल याने 151 चेंंडूत 91 धावांची खेळी केली. तर सरफराज खान 68* धावांसह खेळपट्टीवर नाबाद राहिला.

अनेक चाहते असे म्हणत आहेत, की एका दिवसाचा खेळ बाकी असताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने डाव घोषित करण्याची घाई केली. सरफराज खान याचे शतक होऊ शकते, अशा चर्चा अजूनही आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत रोहित शर्मा रविवारी (18 फेब्रुवारी) भारताचा डाव घोषित आला, तेव्हा सॅन्डसमधून चाहते रोहितच्या या निर्णायशी सहमत दिसले नाहीत. प्रेक्षकांनी रोहितला डाव घोषित करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कर्णधार आपला निर्णय घेऊनच बाहेर आला होता. त्याने अखेर फलंदाजांना ड्रेसिंग रुममध्ये बोलावलेच.

शेवटच्या डावात भारतीय संघाच्या गोलंदाजांपुढे इंग्लिश संघ शेवटच्या डावात 39.4 षटकात सर्वबाद झाला. सामन्यातील आपल्या दुसऱ्या डावात एकही इंग्लिश फलंदाज कमाल दाखवू शकला नाही. पण पहिल्या डावात बेन डकेट 153 धावांची शानदार खेळी केली होती. भारतासाठीही कर्णधार रोहित शर्मा 131, तर रविंद्र जडेजा याने 112 धावा करून बाद झाले.

महत्वाच्या बातम्या – 
बिग ब्रेकिंग! विराटपेक्षाही जास्त सरासरी असलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा क्रिकेटला गुडबाय
 जडेजाने ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार केला पत्नीला समर्पित, अन् वडिलांनी लावला होता रिवाबावर जादूटोण्याचा आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---