नवी दिल्ली – कोरोना वैश्विक महामारीमुळे यावर्षी जगातील सर्वच प्रकारच्या क्रिडा स्पर्धा स्थगित अथवा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रभाव क्रिकेट जगतावर देखील पडलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या पुर्व नियोजनानुसार यावर्षी ऑस्ट्रेेलिया येथे पुरुषांची टी-20 विश्वचषक स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. परंतु एका वृत्तानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, यावर्षी आयसीसीकडून हि स्पर्धा रद्द केली जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे याच कालावधीत विश्वचषकाऐवजी आयपीएलचे नियोजन केले जाणार असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचा पुर्व कर्णधार मार्क टेलर याने देखील याविषयावर बोलताना, आयपीएलचे नियोजन करता येऊ शकेल, असे म्हटले आहे.
“पुर्व नियोजनानुसार ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वचषक स्पर्धाा होणार आहे. मात्र, जर ही स्पर्धा रद्द केली तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) याच कालावधीत आयपीएलचे नियोजन करु शकते. तसेच या स्पर्धेत अनेक देशातील खेळाडू सहभागी होऊ शकतील. मात्र, संबंधीत खेळाडूंचा प्रवास आणि इतर बाबींची जबाबदारी ही त्या खेळाडूंची असेल” असे मार्क टेलर याने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियात सध्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांची तयारी सुरु आहे. 6 जूनपासून ऑस्ट्रेलियामध्ये डार्विन आणि जिल्हा स्तरीय टी-20 स्पर्धा होणार आहेत. महत्वाचे म्हणजे कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात क्रिकेट स्पर्धा होत आहे.
तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ देखील जुलै महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या सामन्यांवेळी काही बदल पहायला मिळू शकतात. जसे की, प्रेक्षकांविना या स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. No T20 World Cup, IPL 2020 Will Take Place In October, Feels Mark Taylor.