---Advertisement---

जगात कोणत्याच संघाला जमला नाही तो विक्रम टीम इंडियाने अखेर केलाच!

---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा आणि शेवटचा टी20 सामना बे ओव्हल स्टेडियमवर पार पडला आहे. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. तसेच 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने मोठा पराक्रम केला आहे.

भारत 5 सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 मालिकेतील सर्व सामने जिंकणारा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाला असा पराक्रम करता आला नव्हता.

आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 163 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडला 164 धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून रोहित शर्माने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुलने 45 धावा केल्या. न्यूझीलंडकडून स्कॉट कुग्लेइझनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर हमीश बेनेटने  1 विकेट घेतली.

त्यानंतर 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 20 षटकात 9 बाद 156 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून टीम सेफर्ड आणि रॉस टेलरने अर्धशतकी खेळी केली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---