जगात सध्या हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 29 मार्चला सुरु होणारा आयपीएल 13वा हंगाम 15 एप्रिल पर्यंत स्थगित केला आहे. याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आमची पहिली प्राथमिकता म्हणजे सुरक्षा आहे.
“सध्याच्या घडीला आम्ही आयपीएल पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यावर कायम आहोत. प्रथम प्राधान्य म्हणजे सुरक्षितता असल्याने, आम्ही खेळ पुढे ढकलले,” असे गांगुलीने आयपीएल पुढे ढकलल्यानंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेदरम्यान सांगितले.
आयपीएलचे भवितव्य काय? असे विचारले असता गांगुली म्हणाला, “काय होते ते आम्ही पाहू. ही वेळ या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फार लवकर असेल.”
या निर्णयावर आयपीएल फ्रँचायझी खुश आहेत का असे विचारले असता गांगुली म्हणाले, “ हा निर्णय मान्य करण्याशिवाय कोणालाही पर्याय नाही.”
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएलचा हंगाम तसाच आहे फक्त सुरु होण्याची तारीखच पुढे ढकलण्यात आली आहे.
याआधी काल(13 मार्च) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची वनडे मालिकादेखील रद्द केली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर पुढील दोन सामने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता रद्द करण्यात आले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बीसीसीआने कॉमेंट्री पॅनलमधून हकलपट्टी केलेल्या मांजरेकरांना सीएसकेने केले असे ट्रोल
–रिचर्डसन पाठोपाठ हा क्रिकेटपटूही सुटला कोरोनाच्या कचाट्यातून…
– जडेजाच्या जादूटोण्यामुळे रणजी ट्रॉफी फायनलमध्ये बंगालचा झाला पराभव? पहा व्हिडिओ