---Advertisement---

आयपीएल २०२१: राजस्थान रॉयल्ससाठी आनंदाची बातमी; ‘हा’ गोलंदाज लवकरच होतोय संघात सामील

On: रविवार, मार्च 28, 2021 6:02 PM
---Advertisement---

येत्या एप्रिल महिन्यापासून भारतात टी२० क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. ९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला प्रारंभ होत आहे.गतवर्षी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. परंतु, यंदा ही स्पर्धा भारतातच होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. अशातच खेळाडूंनी आपापल्या संघात सरावासाठी हजेरी लावायला सुरुवात केली आहे. तसेच राजस्थान संघासाठी आता आनंदाची बातमी आहे. त्यांच्या संघातील वेगवान गोलंदाज लवकरच सराव शिबिरात हजेरी लावणार आहे.

काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्स संघातून जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे आयपीएल मधून माघार घेतली होती. यामुळे राजस्थान रॉयल्स संघाच्या चिंतेत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परंतु, त्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल खेळण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डतर्फे हिरवे कंदील दाखवण्यात आले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता मिन्हाजुल आबेदीन यांनी याची पुष्टी केली आहे की, मुस्तफिजुर रहमान आयपीएलचा १४ वा हंगाम खेळू शकतो. तसेच मिन्हाजुल आबेदीन म्हणाले की,” मुस्तफिजुर रहमानला पुढच्या महिन्यात श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या २ कसोटी सामन्यात संधी न देता त्याला आयपीएल खेळण्याची संधी दिली पाहिजे. आम्ही त्याला आयपीएल खेळण्याची संधी दिली आहे. कारण, श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत तो आमच्या प्लॅनिंगचा भाग नाहीये. त्याच्यासाठी ही चांगली संधी असेल की त्याने आयपीएल खेळावं आणि अनुभव प्राप्त करावा.”

आयपीएल २०२१ मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो. कारण या हंगामात जोफ्रा आर्चर आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मुस्तफिजुर रहमान याला राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल लिलावात १ कोटींच्या मूळ किमतीत संघात समाविष्ट केले आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण २४ सामने खेळले आहेत.यात त्याने २४ गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

INDvENG 3rd ODI: हार्दिक, रिषभचे आक्रमक अर्धशतक; सर्वबाद होऊनही भारताने दिले इंग्लंडला ३३० धावांचे मोठे आव्हान

शार्दुलने ठोकला खणखणीत षटकार, गोलंदाजी करत असलेल्या स्टोक्सने चेक केली बॅट

व्वा! खुद्द पंतप्रधान मोदींनी घेतली मिताली राजच्या कामगिरीची दखल, केलं तोंडभरुन कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---