नवी दिल्ली| आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सामन्याचे रेफरी आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा असा विश्वास आहे की जर गोलंदाजाने चेंडू सोडण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर फलंदाजाला क्रिज सोडण्यापूर्वी धावबाद केले तर (मंकडिंग) ते खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध नाही आणि अशा परिस्थितीत धावचीत झाल्यावर त्या फलंदाजाला सहानुभूती दाखवू नये.
गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये भारतीय फिरकीपटू आर अश्विनने क्रिजच्या पुढे निघालेल्या जोस बटलरला बाद केले होते, त्यानंतर मंकडींग वाद वाढला. या प्रकरणात गोलंदाजाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. परंतु जर फलंदाज अशाप्रकारे धावबाद झाला तर ही गोलंदाजाची चूक नाही असे श्रीनाथ यांचे मत आहे.
श्रीनाथने अश्विनला डीआरएस या त्याच्या यू ट्यूब कार्यक्रमामध्ये सांगितले की, “गोलंदाजाचे लक्ष फलंदाजावर असते. त्यावेळी नॉन स्ट्रायकर फलंदाजासाठी फलंदाजी करत नसल्यामुळे आणि तो काही विचार करत नसल्याने क्रीजमध्ये रहाणे मोठी गोष्ट नाही.”
पण दिल्ली कॅपिटल संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी म्हटले होते की मंकडिंग करणे हे खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध आहे आणि ते अश्विनला तसे करू देणार नाही. गेल्या वर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबचा (केएक्सआयपी) कर्णधार असलेला अश्विन हा १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणाऱ्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळणार आहे.
श्रीनाथ म्हणाले, “फलंदाजाने क्रीज सोडू नये आणि गोलंदाजाने फक्त गोलंदाजीवर आणि ज्या फलंदाजाला आपण चेंडू फेकत आहोत त्या फलंदाजावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर फलंदाज अयोग्य फायदा घेत असेल आणि तो धावबाद झाला असेल तर मला काही हरकत नाही. मला वाटते की हे बरोबर आहे.”
तसेच माजी वेगवान गोलंदाजा श्रीनाथने सांगितले की, नियमात स्पष्टपणे सांगितले होते की, गोलंदाज चेंडू फेकण्यापूर्वी फलंदाजाने क्रीजच्या आतच राहिले पाहिजे. श्रीनाथ म्हणाले, ‘सहानुभूतीचा विचार करू नका. या गोष्टीला खेळ भावनेशी जोडू नका. खेळ भावना नॉन-स्ट्रायकर फलंदाजाशी देखील संबंधित आहे. तो देखील क्रीजमधून बाहेर पडू शकत नाही. जर तो असे करत असेल तर तो खेळाच्या भावनेचे उल्लंघन करत नाही का? माझा विश्वास आहे की फलंदाजाने क्रीजमध्ये रहायला हवे.’
तो म्हणाला, “जरी फलंदाज अनवधानाने क्रीजवरुन निघून गेला आणि सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज तीन फूट पुढे गेला तर ते अन्यायकारक ठरेल. याचा फटका कोणत्याही एका संघाला सहन करावा लागू शकतो. मला येथे संतुलन पहायला आवडेल.”