वनडे विश्वचषक 2023 मधील 22 वा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला जातोय. सोमवारी (23 ऑक्टोबर) चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियम येथे हा सामना खेळला जातोय. या सामन्यात अफगाणिस्तानने मोठा निर्णय घेत चार क्रिकेटपटूंना संघात जागा दिली. त्यापैकी एक असलेल्या नूर अहमद याने विश्वचषकात आपले पदार्पण केले. विश्वचषकातील आपला हा पहिलाच सामना खेळत असलेल्या नूर याने अफगाणिस्तानसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
Noor Ahmed is making an impact straight away. Two wickets already 👏 #AFGvsPAK
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 23, 2023
अफगाणिस्तानने फिरकीला मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर फारूकी याच्या जागी नूर याचा संघात समावेश केला गेला. विश्वचषकातील सर्वात तरुण खेळाडू असलेल्या नूर याने हा निर्णय योग्य ठरवला. त्याने अर्धशतक करून पाकिस्तानचा डाव सावरत असलेल्या अब्दुल्ला शफीक याला पायचित करत मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर या स्पर्धेतील पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज असलेल्या मोहम्मद रिझवान याला केवळ आठ धावांवर बाद केले. त्यानंतर आपल्या अखेरच्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला देखील बाद करून त्याने तिसरा बळी आपल्या नावे केला. त्याने आपल्या दहा षटकांमध्ये 49 धावा देत तिघांना बाद केले.
केवळ अठरा वर्षांचा असलेला नूर या विश्वचषकातील सर्वात युवा खेळाडू आहे. यावर्षी आयपीएलमध्ये नूर हा प्रसिद्धीझोतात आला होता. गुजरात टायटन्स संघासाठी त्याने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होती. चायनामन फिरकीपटू म्हणून तो ओळखला जातो.
(Noor Ahmad Shines In His ODI World Cup Debute Took 3 Wickets)
महत्वाच्या बातम्या –
स्व. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धा । विजय क्लब, श्रीराम क्रीडा विश्वस्त कुमार गटात अंतिम फेरीत
बाजीगर चहल! SMAT ट्रॉफीमध्ये युझीची खळबळ, अवघ्या 58 धावांत गारद केला विरोधी संघ