ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एडम गिलक्रिस्ट काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असल्याचे समोर आले होते. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत गिलक्रिस्ट या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याने चाहते आश्चर्य व्यक्त करत होते. गिलक्रिस्ट अचानक एवढा श्रीमंत कसा बनला? हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता या अहवालाविषयी खुद्द गिलक्रिस्टनेच मोठा खुलासा केला आहे.
या अहवालामध्ये जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या 10 खेळाडूंची नावे सामील केली गेली होती. यात पहिल्या क्रमांकावर ऍडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) 3132 मिलियन डॉलर्सचा मालक असल्याचे सांगितले गेले होते आणि यादीत पहिल्या क्रमांकावर होता. मागच्या वर्षीपर्यंत पहिल्या क्रमांकावर असणारा सचिन मात्र यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. गिलक्रिस्टच्या तुलनेत सचिनची मालमत्ता अवघ्या 170 मिलियन डॉलर्सची होती. या दोघांच्या मलमत्तेतील ही तफावत लक्षणीय होती. याच पार्श्वभूमीवर गिलक्रिस्टविषयी चाहत्यांना अनेक प्रश्न पुडले होते. अशात आता ऑस्ट्रेलियन दिग्गजाने स्वतः याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. गिलक्रिस्टने सांगितल्याप्रमाणे या यादीत त्याचे नाव चुकून पहिल्या क्रमांकावर आले आहे.
गिलक्रिस्टने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावरी ऍडम गिलक्रिस्ट तो स्वतः नाहीये. पहिल्या क्रमांकावरील ऍडम गिलक्रिस्ट एप45 फिटनेस सेंटरचा मालक आहे, जो पूर्वी क्रिकेटपटू होता. याच कारणास्तव सध्या मोठा व्यावसायिक बनलेल्या या गिलक्रिस्टेचे नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर आले. या गिलक्रिस्टने 2022मध्ये 50 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिकची कमाई केली आहे. मागच्या वर्षी त्याची ही कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदनीकृत केले गेले, ज्यामुळे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला.
याविषयी माहिती देताना ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला, “हे लोकांची चुकीची ओळख झाल्यामुळे घडले. यात काहीच शंका नाही की, हा व्यक्त माझ्यासारखेच नाव असणारा दुसरा व्यक्ती आहे. त्याने एफ45 ची स्थापना केली होती आणि क्रिकेट देखील केळला होता.” गिलक्रिस्टच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही पोस्ट करण्यात आली आहे, जी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
A case of mistaken identity here folks. Unless of course my namesake who founded F45 played cricket, in which case it’s completely accurate ???? #doyourresearch #fakenews #yasafesachin https://t.co/fZi1AotQjq
— Adam Gilchrist (@gilly381) March 15, 2023
गिलक्रिस्टने या पोस्टमध्ये “yasafesachin” असा हॅशटॅग देखील वापरला आहे. कारण तेंडुलकर जगातील सर्वात ही माहिती चुकीची असल्याने तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून आपल्या पहिल्या क्रमांकावर कायम आहे. (Not Adam Gilchrist, Sachin Tendulkar is richest cricketer in the world. Gilchrist himself said the report a few days ago was wrong)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जिममुळे क्रिकेटपटूंच्या दुखापती वाढल्या”, भारतीय दिग्गजाने दाखवून दिली सत्य परिस्थिती
बॅटमधून फ्लॉप, पण यष्टीमागे सुपरस्टार! ऑस्ट्रेलियन कर्णधाराला बाद करण्यात राहुलचा सिंहाचा वाटा, पाहा Video






