मोहाली येथे झालेल्या विश्वचषक २०११ च्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. हा सामना पराभूत झाल्याची खंत अजूनही पाकिस्तानी गोलंदाज ‘उमर गुल’ याला सतावत आहे. याबाबत त्याने नव्याने या आठवणीला उजाळा दिला आहे.
२०११ साली भारत,बांगलादेश आणि श्रीलंका या तीन देशात विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यात आले होते. ३० मार्च २०११ला मोहाली येथे भारत विरुद्ध पाकिस्तान असा उपांत्य सामना रंगला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला २९ धावांनी पराभूत करून अंतिम सामन्यात धडक मारली होती. ज्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करून दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता.
उमर गुलला अजूनही खुपतोय पराभव
वनडे विश्वचषक इतिहासात पाकिस्तानने आजवर भारताला एकदाही पराभूत केलेले नाही. असे असले तरीही २०११ साली भारताविरुद्ध विजय मिळवता येईल असा विश्वास सामन्यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुलच्या मनात होता.
उमर गुलच्या मते त्यांचा संघ संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करून सर्व संघांना भारी पडत होता. त्यामुळे एकाच सामन्याने आमची निराशा झाली आणि आमचा विश्वचषक व भारताला विश्वचषकात हरविण्याची संधी दोन्ही हुकले. याच गोष्टीची खंत माझ्या मनात कायम असल्याचे उमर गुलने म्हटले आहे. उमर गुलने पाकिस्तान संघासाठी ४२७ आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत. मात्र तो सध्या पाकिस्तान क्रिकेट संघातुन निवृत्त झालेला असून युवा गोलंदाज घडवण्यावर सध्या अधिकाधीक भर देतोय.
महत्त्वाच्या बातम्या –
बाप रे बाप! साक्षी धोनीने चेन्नईच्या ‘या’ खेळाडूचे केले कौतुक
धोनीच्या चेन्नई संघातील ‘हा’ खेळाडू सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असेल, गौतम गंभीरची भविष्यवाणी
वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video
ट्रेंडिंग लेख –
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…