---Advertisement---

टीम इंडियातून वगळल्यानंतर एमएस धोनी झाला या खेळाच्या स्पर्धेत सामील

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्याला विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतूनही खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते. त्यामुळे तो आॅस्ट्रेलिया विरुद्ध जानेवारीमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल असे अपेक्षित आहे.

सध्या तो रांचीमध्ये सुट्टयांची मजा घेत आहे. त्यामुळे सध्या तो जेएचसी क्रिकेट क्लब, रांची, झारखंड येथे सुरु असलेल्या स्थानिक टेनिस स्पर्धेत सामील झाला आहे.

ही स्पर्धा सोमवारी(26 नोव्हेंबर) पासून सुरु झाली असून 30 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. या स्पर्धेत महिला आणि पुरुषांचे दुहेरी, एकेरीचे सामने तसेच 16 वर्षांखालील टेनिस सांमने होणार आहेत.

धोनी दुहेरी गटातून या स्पर्धेत सामील झाला असून त्याचा बुधवारी सामना होणार असल्याचे वृत्त आहे. त्याचे या दरम्यानचे टेनिस खेळतानाचे अनेक फोटोही सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

धोनी क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांचाही चाहता आहे. त्याची खेळाची सुरुवातही फुटबॉल पासून झाली आहे. तो फुटबॉलचा मोठा चाहता आहे. त्याचबरोबर तो बॅडमिंटन हा खेळही खेळतो हे त्याच्या एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चरित्रपटाही दाखवण्यात आले आहे.

पण आता त्याने टेनिस खेळाकडेही त्याचे लक्ष वेधले आहे. तो स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालचाही मोठा चाहता असल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे. याचबरोबर तो 2016 मध्ये यूएस ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धा पाहण्यासाठीही गेला होता.

त्याचबरोबर सध्या धोनी त्याच्या कुटुंबासमवेतही वेळ घालवताना दिसून आला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी त्याची 3 वर्षांची मुलगी झीवा बरोबर वेळ घालवतानाचे व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

तब्बल ५५ वर्षांनंतर पुन्हा घडला तो इतिहास

आॅस्ट्रेलियाचा फक्त तो एकटाच खेळाडू म्हणतो, विराट एक्सप्रेस थांबवणारच

मला पहिल्या सामन्यात फलंदाजांनी धू-धू धूलते तेव्हा हार्दिक हसत होता- कृणाल पंड्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment