वाशिंगटन सुंदरला त्यांच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी मोहम्मद सिराज, कर्णधार शुबमन गिल, रवींद्र जडेजा यांच्यावर मात करत उद्घाटनात्मक अॅंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील भारताचा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ घोषित करण्यात आलं.
भारत-इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात
कसोटी मालिका लंडनच्या ओव्हल मैदानावर 2-2 अशा रोमांचक ड्रॉ ने संपली. शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने 6 धावांनी नाट्यमय विजय मिळवत इंग्लंडच्या बाजूने असलेल्या अंदाजांना खोडून काढलं. मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) शेवटचा स्टंप उडवत सामना बरोबरीत आणला आणि बीसीसीआयने (BCCI) ड्रेसिंग रूममधील भावनिक क्षण शेअर केला.
‘इम्पॅक्ट प्लेयर’ मेडल जडेजाने वाशिंगटनला दिलं. वाशिंगटनला एजबॅस्टनमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यापासून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने 4 सामने खेळले. त्याने 284 धावा केल्या (एक अर्धशतक, एक शतक) आणि काही महत्त्वाचे बळी घेतले.
तो लॉर्ड्समध्ये 4 विकेट्स घेऊन चमकला, तर मॅंचेस्टरमध्ये जडेजासोबत 5 सत्र टिकून राहून इंग्लंडला ड्रॉवर रोखलं. शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने 53 धावांची टी20 शैलीत खेळी करून भारताच्या 396 धावांच्या डावाला गती दिली.
25 वर्षीय वाशिंगटन सुंदर (Washington Sundar) हा भारताच्या या ऐतिहासिक ड्रॉ मागील खरा हिरो ठरला.






