वेस्टइंडीजचा स्टार विकेटकीपर फलंदाज निकोलस पुरणने (Nicolas pooran) 10 जून म्हणजेच मंगळवार रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पुरणने फक्त 29 वयामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम-राम ठोकला. तरी या यादीमध्ये फक्त पुरणच नाही तर अजूनही अनेक खेळाडू सामील आहेत, ज्यांनी खूप कमी वयामध्ये अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे.
पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपटू सकलैन मुश्ताकने फक्त 27 वयामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली होती. 1955 मध्ये पदार्पण करणाऱ्या सकलैनने त्याचा शेवटचा कसोटी सामना 2004 मध्ये खेळला होता. साऊथ आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉकने देखील 30 वयामध्ये वनडे आणि कसोटी मधून वृत्ती जाहीर केली. रवी शास्त्री यांनी देखील 30 वयामध्ये राष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती,तसेच हेनरीक क्लासेन याने देखील आता 33 वयामध्ये निवृत्तीची घोषणा केलेली आहे.






